घरातील दररोजच्या सदस्यांबरोबर एक असावा निरंतर मित्र, घरातील शांततेत असणारे त्याचे अस्तित्व एक वेगळाच उत्साह देऊन जाते. आपण त्याच्या आजूबाजूला असल्यावर त्याची सुरू होणारी मधुर कुजबुज त्याच्या आपल्यावर असणाऱ्या प्रेमाची साक्ष देते. माणसांपेक्षाही आपल्याला जीव लावणारे प्राणी आणि पक्षी याच कारणामुळे हवेहवेसे वाटतात. पक्ष्यांमध्ये पोपट या पक्ष्याकडे आपले जास्त आकर्षण असते, कारण प्राणी आणि पक्षी यांमध्ये एकमेव बोलणारा पक्षी हे त्याचे वैशिष्टय़ कायद्यानुसार भारतात आढळणारे कोणतेही पक्षी आपण घरात पाळू शकत नसलो तरी परदेशातील पक्ष्यांना घरात पाळण्याची परवानगी आहे. पोपट या पक्ष्याच्या काही परदेशी प्रजाती आहेत. त्यांपैकी घरात पाळू शकणारे एक म्हणजे ऑस्ट्रेलियन किंग पॅरट.
ऑस्ट्रेलियातील पूर्व भागात आढळणारे हे ऑस्ट्रेलियन किंग पॅरट १८१८ साली आढळले अशी नोंद आहे. ज्या ठिकाणी भरपूर पाऊस पडून घनदाट जंगल तयार झालेले असते अशा ठिकाणी उंच झाडाझुडपांवर ऑस्ट्रेलियन किंग पॅरट पाहायला मिळतात. १८१८ साली मार्टिन लिस्तेन्सिअन या निसर्गप्रेमी असलेल्या जर्मन व्यक्तीला हे ऑस्ट्रेलियन किंग पॅरट ऑस्ट्रेलियाच्या जंगलात आढळले. भारतात साधारण १९६५ च्या नंतर हे पक्षी येण्यास सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियन किंग पॅरट हे त्यांच्या विशिष्ट रंगासाठी लोकप्रिय आहेत. या पक्ष्यांच्या रंगांमुळे घरात पाळण्यासाठी खूप मागणी आहे. नर पक्ष्याचे डोके, पोट, आणि छाती लाल रंगाची असून हिरव्या रंगाची पाठ असते. निळ्या रंगाचा कंठ या पोपटाच्या मानेवर असतो. तसेच मादी पोपटाचे डोके, पोट आणि छाती हिरव्या रंगाची, पाठीवर गडद करडा रंग असतो. मादी पोपटाच्या मानेवर कधी फिकट कंठ आढळतो किंवा कधी हा कंठ आढळत नाही.
परदेशी पोपटाच्या ग्रे पॅरट या जातीप्रमाणे ऑस्ट्रेलियन किंग पॅरट बोलू शकत नाहीत. मात्र वेगवेगळ्या आवाजाची किमया या पोपट पक्ष्यांनी साधली आहे. या पक्ष्यांना शिकवलेले आवाज काढून घरातल्या सदस्यांचे मनोरंजन करतात. आकलनक्षमता, बुद्धिमत्ता जास्त नसल्याने प्रशिक्षणाने आपले कौशल्य हे पक्षी दाखवतात. लहानपणापासून हे पोपट घरात पाळलेले असल्यास सवयीने घरातील सदस्यांच्या हातावर येऊन बसण्याएवढी कृती करतात.
जंगलात राहण्याची सवय असल्याने खाण्यासाठी जंगलातील कोणतीही फळे हे पोपट खाऊ शकतात. प्रामुख्याने फळांच्या बिया खाण्याची आवड या पोपट पक्ष्यांना असते. साधारण ४५ सेमी.पर्यंत ऑस्ट्रेलियन किंग पॅरट या पक्ष्यांची उंची असते. भारतात कोलकत्ता आणि आंध्र प्रदेश या ठिकणी मोठय़ा प्रमाणात या ऑस्ट्रेलियन किंग पॅरटचे ब्रीडिंग केले जाते. अंबरनाथमध्ये राहणाऱ्या अल्बर्ट अमला यांच्याकडे त्यांनी ऑस्ट्रेलियन किंग पॅरट पाळले आहे.

जोडी पिंजऱ्यात शोभते..
ऑस्ट्रेलियन किंग पॅरट हे त्याच्या शारीरिक सौंदर्यामुळे लोकप्रिय असल्याने हे पक्षी नर आणि मादी अशा जोडीने पिंजऱ्यात ठेवल्यास शोभून दिसतात. या पक्ष्यांना मोकळे ठेवता येत नाही मात्र पिंजऱ्यात एकत्र असणाऱ्या या पक्ष्यांपैकी नर आणि मादी ओळखणे कठीण असते. बहुतांश वेळा या पक्ष्यांचा पंखाकडचा काही भाग कापून आणि डीएनए चाचणी करून नर किंवा मादी हे ओळखले जाते.
सावली आणि थंड हवा आवश्यक
ऑस्ट्रेलियन किंग पॅरट या पक्ष्यांना ऊन सहन होत नाही. सावली आणि थंड हवा असल्यास या पक्ष्यांचे आरोग्य उत्तम राहते. शांतता असणाऱ्या घरात हे पोपट उत्तमरीत्या राहू शकतात. मूळचे घनदाट जंगलाची सवय या पोपट पक्ष्यांना असल्याने घरात पाळताना आजूबाजूला हिरवळ असल्यास त्यांना अधिक भावते. परक्या व्यक्तीसमोर हे पोपट फारसे रुळत नाहीत.
jadhav.kinnari1@gmail.com

South Africa squad announced for T20 World Cup 2024
T20 WC 2024 : विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर! IPL मध्ये डंका वाजवणाऱ्या ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी
jyoti surekha vannam
ज्योतीची सुवर्ण हॅट्ट्रिक;  विश्वचषक तिरंदाजीमध्ये कम्पाऊंड प्रकारात भारताला पाच पदके
Afghanistan Cricketer rashid khan
क्रिकेटने अफगाणिस्तानमधील जनता आनंदी – रशीद खान
Railway Bharti 2024
Railway Bharti 2024 : रेल्वेमध्ये टेक्निशियनच्या ९००० पेक्षा अधिक पदासाठी होणार भरती, आजच करा अर्ज