मुलुंडमधील वझे-केळकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘झपूर्झा’ आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत उल्हासनगरचे सीएचएम महाविद्यालय अव्वल ठरले आहे. या स्पर्धेतील मानाचा समजला जाणारा झपूर्झा (युवा एक झेप) हा फिरता चषक उल्हासनगर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने पटकवला. सी.एच.एम. महाविद्यालयाच्या वतीने स्पर्धेत उतरलेल्या अठरा स्र्पधकांनी सोळा स्पर्धामध्ये सहभाग नोंदवत दहा स्पर्धामध्ये यश संपादन केले. मुंबई विद्यापीठातील ३० महाविद्यालये या स्पर्धेत सहभागी झाले होते. सचिन हुंकारे याच्या संघाने पथनाटय़ाचे प्रथम पारितोषिक जिंकले.