Premium

पायी अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांना मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा कंदील

मीरा भाईंदर शहरातून जवळपास तीनशे राम भक्त पायी अयोध्येला जाण्यास निघाले आहेत.

Chief Minister eknath shinde showed green signal to Ram devotees going to Ayodhya by walk
राम भक्ताचे मनोबल वाढावे म्हणून शिंदे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. (फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाईंदर : मीरा भाईंदर शहरातून जवळपास तीनशे राम भक्त पायी अयोध्येला जाण्यास निघाले आहेत. या नागरिकांची यात्रा सुरळीत व्हावी म्हणून खुद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरा रोड येथे हजेरी लावून त्यांना प्रोत्साहन दिले.

मीरा भाईंदर शहराचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने जवळपास ३०० राम भक्त रविवारी अयोध्येच्या दिशेने पायी निघाले आहेत. ४७ दिवसाचा प्रवास करून हे २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या उदघाटन प्रसंगी तिथे पोहचणार आहेत. त्यामुळे या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी मुंबई-अहमदाबाद महामार्गांवरील सगनाई नाका येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली.

आणखी वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमात राष्ट्रध्वजाचे उलटे छायाचित्र

राम भक्ताचे मनोबल वाढावे म्हणून शिंदे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मोदीच्या प्रयत्नांमुळे बाळासाहेबांचे स्वप्न असलेले राम मंदिर प्रत्यक्षात उभे राहिल्याचा आनंद त्यानी व्यक्त केला. याशिवाय मोदीच्या पुढाकारे चांगली कामे होत असून याने जगभर आपल्या देशाचे कौतुक होत आहे. यापूर्वी केवळ ‘घर घर मोदी’ अशी घोषणा होती. मात्र आता ‘मन मन मोदी’ म्हणाची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. तर आता देश भरात एकार्थी राम राज्य आले आल्याचा दावा शिंदे यांनी केला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chief minister eknath shinde showed green signal to ram devotees going to ayodhya by walk mrj

First published on: 10-12-2023 at 16:50 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा