डोंबिवली – आपल्या पत्नीशी शेजारी राहणाऱ्या एका मजुराचे अनैतिक संंबंध आहेत. अशाप्रकारे एकमेकांविषयी संशय घेऊन नेहमी दारू पिऊन भांडण करणाऱ्या दोन मजुरांमध्ये शनिवारी रात्री जोरदार भांडण झाले. यामध्ये एका मजुराने लाकडी दांडका दुसऱ्या मजुराच्या डोक्यात मारल्याने त्याचा मृत्यू झाला.

डोंबिवली जवळील प्रीमिअर कंपनीच्या मागील उसरघर गाव हद्दीत मानपाडा-दिवा रस्त्यावर ही घटना घडली आहे. जोहरअल्ली प्यारे अन्सारी (३२) असे मयत मजुराचे नाव आहे. तो मुळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. तो उसरघर येथील कोहिनूर या गृहप्रकल्पात तारतंत्री म्हणून काम करत होता. तो उसरघर येथे पत्नी आणि तीन मुलांसह राहत होता. मागील चार वर्षापासून अन्सारी कुटुंब उसरघर भागात राहते. आपल्या पत्नीचे आपल्या शेजारी राहणाऱ्या ताहियादअली अन्सारी (२४) याच्याबरोबर अनैतिक संबंध आहेत, असा संशय घेऊन मयत जोहरअल्ली नेहमी पत्नीला घरात मारहाण करत होता. ताहियादअली याला आपल्या पत्नीचे मयत जोहरअल्ली याच्याबरोबर अनैतिक संबंध आहेत असा संशय होता. या विषयावरून जोहरअल्ली आणि ताहियादअली यांच्यात नेहमी रात्रीच्या वेळेत भांडण होत होते.

हेही वाचा – कपिल पाटलांच्या विजयासाठी कथोरेंचे विशेष मनोगत, घरोघरी पोहोचवलेल्या प्रचार पत्रावर कथोरेंचे आवाहन

शनिवारी रात्री जोहरअल्ली नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला. त्याने पत्नीशी भांडण उकरून काढून तिला बेदम मारहाण शिवीगाळ सुरू केली. पती आपणास जिवानिशी मारील या भीतीने जोहरअल्लीच्या पत्नीने ओरडा केला. यावेळी शेजारी राहणारा ताहियादअली हा धावत घरात आला. त्याने जोहरअल्लीला समजून सांंगितले. त्याला शांत राहण्याचा सल्ला दिला. जोहरअल्लीने त्यालाही शिवीगाळ सुरू केली. दोघांंमधील घरातील वाद रस्त्यावर सुरू झाला.

हेही वाचा – कल्याणमधील चिंचपा़डा, व्दारली येथील हरितपट्ट्यावरील जीन्सचे ३२ कारखाने जमीनदोस्त, प्रदुषणाने परिसरातील नागरिक होते त्रस्त

जोहरअल्ली शिव्या देणे थांबत नाही म्हणून ताहियादअल्ली याने जवळच पडलेला एक लाकडी दांडका उचलून तो जोहरअल्लीच्या डोक्यात जोरात मारला. रक्तस्त्राव सुरू असल्याने जोहरअल्लीला पत्नीने मानपाडा येथील खासगी रुग्णालयात नेले. तेथे त्याच्यावर उपचार करून पुन्हा घरी आणण्यात आहे. जोहरअल्ली वाटेत बेशुद्ध पडला. त्याला घरी आणण्यात आले. सकाळी त्याला पत्नी झोपेतून उठवित असताना तो कोणतीही हालचाल करत नव्हता. जोहरच्या पत्नीने ठेकेदार सतीश यादव यांच्या साहाय्याने जोहरला पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेले. तेथे त्याला डाॅक्टरांनी मयत घोषित केले. मानपाडा पोलीस ठाण्यात जोहरअल्लीच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांंनी गुन्हा दाखल केला आहे.