मूळ कागदपत्रांची पडताळणी न करताच दस्तनोंदणी

अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात सादर केल्या जाणाऱ्या दस्तांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र हे आदेश वसई-विरारच्या दुय्यम निबंधक कार्यालयात सर्रास धाब्यावर बसवले जात आहेत. मूळ कागदपत्रांची कोणतीही पडताळणी केली जात नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विरार येथील या कार्यालयात अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी करू नये, असे पत्र एका राजकीय पक्षाने बुधवारी दिले असून याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Ten pigs are dying every day and citizens are suffering but there is no solution from the administration
अरेरे! हे काय, डुकरं पटापट मरताहेत आणि प्रशासन मात्र ढिम्म…
Onion growers allege central government cheating Pune print news
निर्यातबंदी उठविल्याची धूळफेक, केंद्र सरकारने फसवणूक केल्याचा कांदा उत्पादकांचा आरोप
msrtc buses, Scrapped msrtc buses, Maharashtra ST Corporation, Scrapped buses, no data msrtc, good buses, bad buses, out of order buses, rti, maharashtra st, maharshtra buses, marathi news, maharashtra news,
धक्कादायक! ‘एसटी’कडे चांगल्या, नादुरुस्त बसेसची माहितीच नाही!
Violation of Right to Information by Regional Psychiatric Hospital in Nagpur
नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाकडून माहिती अधिकाराचा भंग, सामाजिक कार्यकर्ते म्हणतात…

वसई-विरारमध्ये बांधकाम व्यावसायिकांकडून बोगस सीसीच्या आधारे अनधिकृत इमारती बांधल्या जात आहेत. अशा इमारतींच्या सदनिकांची दस्त नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयात केली जाते. तेथे बनावट कागदपत्रे सादर करून ही नोंदणी केली जात असल्याचे लक्षात आले होते. ते थांबविण्यासाठी सहजिल्हा निबंधकांनी सदनिकांचे दस्त नोंदणी करताना बिनशेती आदेश, बांधकाम परवानग्या, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, सातबारा उतारे, सिटी सव्‍‌र्हे, प्रॉपर्टी कार्ड, सूची क्रमांक दोन आदींच्या मूळ प्रतींची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यापूर्वीच पालिका आणि पोलिसांनी अशा सूचना केल्या होत्या, तरीदेखील दस्तनोंदणी होत होती. मूळ कागदपत्रांची पडताळणी करा, असे लेखी पत्र पालिका आयुक्तांनी दुय्यम निबंधकांना दिले होते. मात्र तरीही हा प्रकार सुरू  होता. बांधकाम व्यावसायिकांनी बनावट कागदपत्रे सादर करून दस्तनोंदणी करू नये यासाठी त्यांची मूळ कागदपत्रे तपासायचे आदेश जिल्हा निबंधकांनी दिले आहेत. मात्र पालिका आणि पोलिसांनी यापूर्वीच अशा नोंदी न करण्याच्या सूचना देऊनही त्या केल्या जात असल्याचे उघड झाले आहे. दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

शिवसेनेची चौकशीची मागणी

विरारच्या भूमापन हिस्सा क्रमांक-२२८ येथे बहुमजली इमारत उभी राहत आहे. या इमारतीसाठी बोगस परवनाग्या वापरून काम सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. मुळात हे बांधकाम बेकायदा असल्याने तेथे घरे घेणाऱ्या ग्राहकांची फसवणूक होणार आहे. त्यामुळे या बांधकामांच्या दस्तांची नोंदणी करू नये, असे पत्रच शिवसेनेने वसईतील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयाला दिले आहे. शिवसेना वसई तालुका प्रमुख नीलेश तेंडोलकर यांनी हे पत्र दिले असून याप्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

एकाही बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा नाही

बांधकाम व्यावसायिक अनधिकृत इमारत बांधतांना अनेक जणांना त्यात सहभागी करून घेत असतो. दुय्यम निबंधक कार्यालयाचा हा कारभार पाहता त्यांचासुद्धा यात सहभाग असण्याची शक्यता शिवसेनेने वर्तवली आहे. वसईतल्या अनेक बांधकाम व्यावसायिकांनी दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट कागदपत्रे सादर करून नोंदणी केल्या आहेत, तरीदेखील एकाही बांधकाम व्यावसायिकाविरोधात दुय्यम निबंधकांनी तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आला नाही.