ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे ठाण्यातील काही भागातील पाणीपुरवठा गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

हेही वाचा – डोंबिवलीतील कोपरमध्ये उद्यानाच्या आरक्षित भूखंडावर बेकायदा इमारत

हेही वाचा – आनंद दिघे यांच्या बहिणीला पॅरालिटीक अटॅक, रुग्णालयात दाखल

एमआयडीसीच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत काटई नाका ते शीळ टाकी येथे जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवार रात्री १२ या कालावधीत पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार आहे. या कालावधीत ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा, मुंब्रा (प्रभाग क्रमांक २६ आणि ३१ मधील काही भाग वगळता ) कळवा, वागळे इस्टेट येथील रुपादेवी पाडा, किसननगर क्रमांक दोन, नेहरुनगर, कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा २४ तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल अशी माहिती ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.