लोणावळय़ाच्या दक्षिणेला भाबुर्डेपर्यंत एक रस्ता गेला आहे. या वाटेने गेलो की, सह्याद्रीच्या मुख्य धारेवरचे उग्र रूप पुढय़ात उभे राहते. कोरीगड, धनगड, तेलबैला, सुधागड सारखे गिरिदुर्ग, असंख्य घाटवाटा, गिरिशिखरे, कडे, सुळके या साऱ्यांनी सह्याद्रीचे एक वेगळेच दर्शन इथे घडते. या खेळामध्येच भांबुडर्य़ाच्या पाठीशी एक आडवी डोंगररांग लक्ष वेधून घेते. तिचे नाव वऱ्हाड! या पर्वतावर दोन बाजूला सुळके आहेत, तर मधोमध उभा असलेला एक अभेद्य पर्वत दिसतो. यातील बाजूच्या दोन सुळक्यांना नवरा, नवरी तर मधोमध असलेल्या पर्वताला वऱ्हाड अशी स्थानिक भाषेतील नावे आहेत. मुंबईच्या ‘गिरिविराज हायकर्स’ने नुकतेच या वऱ्हाड पर्वतावरील सर्व सुळके, माथ्यावर यशस्वी पाऊल टाकले.

या ट्रेकिंग क्लबतर्फे जानेवारीपासून या मोहिमेची आखणी, तयारी करण्यात येत होती. मोहिमेचा चढाईचा मार्ग आणि उर्वरित नियोजन झाल्यावर संस्थेतर्फे नुकतीच ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. यातील वऱ्हाड नावाच्या पर्वताची, त्याच्या उभ्या कडय़ाची उंची होती तब्बल २०० फूट. तर त्याखालोखाल शेजारच्या नवरा, नवरी सुळक्याची उंची होती. या तीनही सुळक्यांसाठी तीन स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आले आणि संस्थेच्या गिर्यारोहकांनी ते पूर्ण केले. यातील मुख्य चढाई हितेश साठवणे आणि वासुदेव दळवी या गिर्यारोहकांनी केली.

mumbai, renovation work, historic Banganga Lake, Walkeshwar, Municipal Corporation of Mumbai
मुंबई : बाणगंगा ते अरबी समुद्र मार्गिकेसह तलावाभोवती भक्ती परिक्रमा मार्ग
at least 24 dead in highway collapse in china
चीन महामार्ग दुर्घटनेत २४ जणांचा मृत्यू
Heat wave in most parts of the state including Konkan coast as per weather department forecast
पुन्हा उष्णतेच्या झळा; ‘थंड हवेची ठिकाणे’ही उकाड्याने हैराण, पर्यटकांची निराशा
power supply of Kalyan East was suddenly interrupted in early morning
उकाड्याच्या होरपळीत कल्याणमध्ये विजेचा लपंडाव, उकाड्याने नागरिक हैराण