बाराहून जास्त वेळा यशस्वीपणे आफ्रिकेत शिबिरेघेतल्यानंतर ‘बीएनएचएस’ पुन्हा   एकदा या वन्यजीव पंढरीत जात आहे. झेब्रे व बिल्डबिस्ट हरणांचे वार्षिक स्थलांतर पाहण्याची ही चांगली संधी आहे. याशिवाय या आफ्रिकन सफारीमध्ये मसाई जिराफ, थॉमसस गझेल, हरण, पट्टेवालं व ठिपकेवाले तरस, आफ्रिकन सिंह, आफ्रिकन हत्ती, कुटू व इलँडसारखी हरणे, काळा गेंडा, सेरवल रानमांजर, रानम्हैस व नाईल मगर या ठिकाणी दिसू शकतात. पक्ष्यांमध्ये सचिव पक्षी, आफ्रिकन मत्स्य गरुड, जांभळ्या जातीचा नीलपंख, लावण्य मैना, दक्षिणी    भू धनेश, लाल चोचीचा धनेश व कोरी माळढोक येथे  दिसू    शकतात. सेरेंगेटी, गोरोंगोरो व तारांगीरे अभयारण्यांनाही या शिबिरादरम्यान भेट दिली जाणार आहे. बॉम्बे नॅचरल   हिस्ट्री  सोसायटीच्या वतीने १ ते ८ मार्च २०१४ दरम्यान आयोजन केले आहे.   अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी bnhs.programmes@gmail.com या संकेतस्थळावर किंवा हॉर्नबिल हाउस (०२२-२२८२१८११/ २२८७१२०२) इथे संपर्क साधावा.

भंडारदरा सहल
‘नो मॅड्स’तर्फे येत्या ७, ८ ऑक्टोबर रोजी भंडारदरा धरण, घाटघर, अमृतेश्वर मंदिर, कोकणकडा आदी स्थळांच्या भ्रमंतीचे आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी अनिकेत बाळ (९८२२४३३२५५) यांच्याशी संपर्क साधावा.
हिमालयातील पदभ्रमण
‘अ‍ॅडव्हेंचर लाइफ’ तर्फे मनाली, सोलंगनाला, धुंदी, बख्खरथाज आदी स्थळांवर पदभ्रमणाचे आयोजन केले आहे. याशिवाय या परिसरातील बियास नदीच्या काठावरील ‘फ्रेंडशिप’ या हिमपर्वतावर चढाईचे आयोजनही केले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी ९४२३००३९७३ या क्रमांकावर संपर्क साधावा.
सज्जनगड- ठोसेघर भ्रमण
आनंद-सहल संस्थेतर्फे येत्या ८, ९ ऑक्टोबर रोजी कास पठार, सज्जनगड, ठोसेघर, कास तलाव परिसरात पदभ्रमणाचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी शैलजा बोकील (९८८११६५७७४) यांच्याशी संपर्क साधावा.
ताडोबा सफारी
‘जंगल कब’ तर्फे येत्या १९ ते २४ नोव्हेंबर दरम्यान ताडोबा जंगल सफारीचे आयोजन केले आहे. या भ्रमंतीला जोडून आनंदवन, हेमलकसा आणि सोमनाथ प्रकल्पांनाही भेटी दिल्या जाणार आहेत. अधिक माहितीसाठी ०२०-२४४९९९५९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन ‘ट्रेक इट’ दर बुधवारी आपल्याला भेटते! ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव लिहूनही आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी –  ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता,  ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५. Email – abhijit.belhekar@expressindia.com