News Flash

१२ इंचांच्या दोन पिझ्झांपेक्षा एक १८ इंचाचा पिझ्झा घ्या, कारण…

जाणून घ्या नेमके काय आहे गणित

पिझ्झा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडीचा पदार्थ. कधी बाहेर जाऊन तर कधी घरी ऑर्डर करुन पिझ्झावर ताव मारला जातो. आता पिझ्झा ऑर्डर करायचा म्हटल्यावर त्याच्या टॉपिंगचे कॉम्बिनेशन ठरवले जाते. त्यानंतर तो किती इंचाचा घ्यायचा यावर चर्चा सुरु होते. किती व्यक्ती खाणार त्यावरुन आपण किती इंचांचा घ्यायचा हे ठरवतो. पिझ्झा गोल असल्याने तो इंचांच्या हिशोबाने मोजला त्यामुळे कधी १२ इंच तर कधी १८ इंच असा ऑर्डर केला जातो. मग दोन जण असतील तर १२ इंचाचे २ पिझ्झा मागवले जातात. पण त्यापेक्षा १८ इंचाच्या पिझ्झामध्ये अधिक पिझ्झा येत असल्याचे नुकतेच समोर आले आहे. आता हे कसे काय? तर गणिताचा आधार घेऊन हे सिद्ध करुन दाखवले आहे.

१२ इंचाच्या पिझ्झा २२६ स्क्वेअर इंचांचा असतो. तर १८ इंचाचा पिझ्झामध्ये २५४ स्क्वेअर इंच पिझ्झा मिळतो. फरमॅटस लायब्ररी या ट्विटर अकाऊंटवर हे गणित करुन दाखवण्यात आले आहे. या पोस्टवर असंख्य खवय्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पिझ्झा तयार करणाऱ्या कंपन्यांना हे आधीपासूनच माहित असूनही त्यांनी आपल्यापासून इतक्या वर्षांपासून हे दडवून ठेवले. मात्र आता सत्य समोर आले असून सर्वांना पिझ्झा कंपन्यांचे गणित लक्षात आले आहे. त्यामुळे आता पिझ्झा ऑर्डर करताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणेच ऑर्डर करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2019 1:55 pm

Web Title: one 18 inch pizza has more in quantity than two 12 inch ones
Next Stories
1 BEST Strike: भारतात संप म्हणजे प्रवाशांचे हाल, जपानमधील संपात प्रवासी खुशहाल
2 PHOTO: खरोखरच ‘पृथ्वीवरील स्वर्ग’… वर्षातील पहिल्या बर्फवृष्टीनंतरचे काश्मीरमधील फोटो पाहाच!
3 उद्योजकाला अर्ध्या रात्री ६ मिस कॉल…खात्यातून गायब झाले तब्बल १.८६ कोटी
Just Now!
X