Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण येथे आपली कला दाखवत असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतात तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात. कधी कोणी हटके जुगाड शोधतात तर कधी कोणी भयानक स्टंट करताना दिसतात. काही व्हिडिओ पाहून हसायला येते तर काही व्हिडिओ आश्चर्यचकीत करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने दुचाकीवर असेच स्टिकर लावले की ते पाहून तुम्हीही डोकं धराल. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. (a husband put sticker on bike funny quote sticker video viral)

काय आहे स्टिकर ?

अनेक लोकांना गाडीवर मग ती दुचाकी असो किंवा चार चाकी गाडीच्या समोरच्या बाजूला किंवा मागच्या बाजूला स्टिकर लावायला आवडते काही लोकांना देवी देवतांचे फोटो लावायला आवडतात तर काही लोकांना त्यांच्या आदर्श व्यक्तींचे फोटो लावायला आवडतात. काही लोक गाड्यांवर सुंदर सुविचार लिहितात तर काही लोक मजेशीर वाक्यप्रचार लिहितात. या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एका व्यक्तीने त्याच्या दुचाकी वर असे काही लिहिले की ते पाहून तुम्हालाही हसू येईल.
या व्हिडिओ मध्ये एक व्यक्ती दुचाकी वर स्टिकर लावताना दिसत आहे. स्टिकर वर इंग्रजीत लिहिले आहे, “सॉरी गर्ल्स माय वाईफ इज व्हेरी डेंजर” (Sorry Girls, my wife is very danger) हे स्टिकर पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. पुढे व्हिडिओ तुम्हाला दिसेल या स्टिकर्सह एक इमोजी सुद्धा लावलेला आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे .

हेही वाचा : आयुष्य एकदाच मिळतं, फक्त मनभरून जगता आलं पाहिजे! वयाच्या नव्वदीत आजीने केला भन्नाट डान्स, ऊर्जा पाहून व्हाल थक्क

पहा वायरल व्हिडिओ

हेही वाचा : जेव्हा माणुसकी जिंकते; पुरात अडकलेल्या श्वानांना काढलं शोधून; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल भावूक

star_bike_modified इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी हसण्याची इमोजी शेअर केले तर काही युजर्सनी स्टिकरवर लिहिलेले इंग्रजी वाक्य चुकीचे आहे, असे लिहिलेय. एक युजर लिहितो, “पत्नीचा पावर” तर एक युजर लिहिते, “माफ करा मुलांनो, माझा नवरा खूप प्रामाणिक आहे”