Viral Video : असं म्हणतात वय हा फक्त एक आकडा जर आपल्यात तरुणपणातलाच तोच उत्साह किंवा जिद्द असेल तर तर वयाकडे कधीच लक्ष जात नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच एका आजीबाईचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आजी बिनधास्त डान्स करताना दिसत आहेत. आजीचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

सोशल मीडियावर दर दिवशी अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो. कधी कोणी जुगाड शोधतो तर कधी कोणी स्टंट करताना दिसतो. काही व्हिडिओ पाहून हसायला येते तर काही व्हिडिओ पाहून मन भावूक होते. काही व्हिडिओ तर आपल्याला ऊर्जा देणारे असतात. या आजीबाईच्या डान्स व्हिडिओ पाहून तुम्हालाही ऊर्जा मिळेल कारण आजीचा डान्स करतानाचा उत्साह हा तरुणाईलाही लाजवणारा आहे.

हेही वाचा : “सिगारेट न पिणारे Losers…” तरुणीच्या पोस्टवर डॉक्टरांनी सुनावले खडेबोल; Post व्हायरल

हा व्हायरल व्हिडिओ एका सार्वजनिक कार्यक्रमातला आहे. व्हिडिओत तुम्हाला दिसेल एका स्टेजवर गायक आणि गायिका सुरेख असं गाणं गात आहे. व्हिडिओत एक आजी या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. आजचा डान्स पाहून तुम्हीही अवाक व्हाल. आजीच्या डान्स स्टेप्स, चेहऱ्यावरील हावभाव आणि ऊर्जा एकंदरीत कोणालाही थक्क करेन.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Viral Video : वडिलांचा संघर्ष कुणाला दिसत नाही! नळ्याच्या पाण्याने पोळी भिजवून खातोय, व्हिडीओ पाहून येईल डोळ्यात पाणी

nanda.ruidas.35 आणि anup_jitu_official1991 या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये काही हॅशटॅग लिहिलेय जसे की #viralreels #90yearsold #superdance
यावरून तुम्हाला कळेल की या आजीचे वय जवळपास 90 वर्ष आहे तरीसुद्धा आजीची ऊर्जा आणि उत्साह सर्वांना प्रेरणा देणारा आहे.
या व्हिडिओवर अनेक युजर्स प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी या व्हिडिओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहे. एका युजरने लिहिलेय, ” वय फक्त आकडा असतो तर एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम डान्स” आणखी काही युजरने लिहिलेय, “आजीकडून आपण शिकायला पाहिजे”

यापूर्वी सुद्धा वयोवृद्ध लोकांचे डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाले आहे. एका महिन्यापूर्वी असाच एक नाशिकच्या आजोबांचा डान्स व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये आजोबा बिनधास्त डान्स करताना दिसले होते. त्यांचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल आणि त्यांची ऊर्जा पाहून कोणीही त्यांचा चाहता होईल. त्यांच्याबरोबर अनेक वृद्ध लोक सुद्धा व्हिडीओमध्ये डान्स करताना दिसले होते.