सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, यामध्ये जुगाडू व्हिडीओंचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. अनेकदा काही लोक असा काही जुगाड करतात जो पाहून आपण आश्चर्यचकित होतो. खरं तर, आपल्या देशात जुगाड करणाऱ्या लोकांची कमतरता नाही, जुगाडाच्या बाबतीत भारतीय खूप फेमस आहेत. ते कधी बाईकच्या माध्यमातून जड विटा इमारतीवर नेण्यासाठी जुगाड करतात तर कधी बाईकचा वापर करुन तलावातील पाणी शेतात नेतात. याबाबतचे अनेक व्हिडीओ आपण याआधीही पाहिले आहेत. सध्या अशाच आणखी एका अनोख्या जुगाडाचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये कारच्या एक्सलेटरप्रमाणे एका व्यक्तीने चक्क बाइकच्या फूटरेस्टवर एक्सलेटर जोडला आहे. जे पाहून अनेकजण थक्क झाले आहेत तर कोही लोकांनी हा जुगाड दिव्यांगांसाठी खूप उपयोगी ठरू शकतो, असं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या अनोख्या जुगाडाचा व्हिडीओ १६ नोव्हेंबर रोजी Rdx Chhoti नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. जो आतापर्यंत जवळपास कोट्यवधी लोकांनी पाहिला आहे, तर ७ लाखांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “ब्रेक एस्केलेटर” या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, या व्यक्तीने बाईकला कारप्रमाणे एक्सलेटर लावला असून तो आपल्या पायाने एक्सीलरेटर दाबून दाखवत आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

या जुगाडाच्या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं, “भारत असाच चंद्रावर पोहोचला नाही, प्रत्येक गल्लीत वैज्ञानिक आहेत.” तर दुसऱ्या एकाने, “हा जुगाड भारताबाहेर जाऊ देऊ नका” असं लिहिलं आहे. तर अनेक वापरकर्त्यांनी जुगाडचे कौतुक करत तो बनविणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार मिळाला पाहिजे असं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accelerator attached to the bike like a car video of a unique trick goes viral on social media jap
Show comments