अनुपम खेर बॉलीवूडमधील उत्कृष्ठ अभिनेत्यांपैकी आहेत. अनुपम खैर सौशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. अनेकदा समाजातील विविध प्रश्नावर आणि त्यांच्या अनुभवांबद्दल व्हिडिओ शेअर करतात. अलीकडेच, ते रस्त्यावर कंगवा विकणाऱ्या विक्रेत्याशी संवाद साधला. त्याच्याशी झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ त्याच्या अधिकृत अकाऊंटवर शेअर केला. याच व्हिडिओमध्ये अभिनेत्याने विनोदीपणे स्वत:ची थट्टा केली आहे. एवढंच नाही तर डोक्यावर एकही केस नसताना त्यांनी कंगवाही खरेदी केले. या व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.

अनुपम खेर यांनी खरेदी केला कंगवा, विक्रेत्याचा व्हिडिओ केला शेअर

व्हिडिओ शेअर करताना खेर यांनी लिहिले की, ‘टक्कल आणि सुंदर(BALD AND BEAUTIFUL!!). मुंबईत मजेशीर भेट- राजू मुंबईच्या रस्त्यांवर कंगवा विकतो. माझ्याकडे कंगवा विकत घेण्याचे काही कारण नाही. पण आज त्यांचा वाढदिवस होता. आणि त्याला वाटले की, मी एखादा विकत घेतले तर ही त्याच्यासाठी चांगली सुरुवात असेल. मला खात्री होती की, त्याने त्याच्या आयुष्यात चांगले दिवस पाहिले असतील. तिचे स्मित सकारात्मक आणि प्रेरणादायी होते. जर तुम्ही त्याला कधी पाहिले तर कृपया त्याची कंगवा खरेदी करा. तुमचे केस आहेत की नाही हे महत्त्वाचे नाही. आपल्या साध्या व्यक्तिमत्त्वाने la तुमचा दिवस चांगला करेल.”

हेही वाचा – Video : MS DHONIचा फोटो समोर ठेवून तरुणीने तब्बल ८ तासात पूर्ण केले ११८०६ स्क्वॉट्स; गिनीज बुकमध्ये झाली नोंद!

अनुपम खेर यांनी कंगवा विकत घेतल्याने विक्रेता खूश झाला.

व्हिडीओच्या सुरुवातीला, अनुपम खैर विक्रेत्याला त्याचे नाव विचारतात तेव्हा तो त्याचे नाव राजू असल्याचे सांगतो. त्याचा आज वाढदिवस असल्याचेही सांगतो. कंगवा विक्रेता आपल्याला कंगवा विकतो आहे हे अनुपम यांनाच मजेशीर वाटत होते कारण प्रत्यक्षात त्यांच्या डोक्यावर एकही केस नाही. ते विक्रेत्याला म्हणतातही, “मला कंगवा विकणे थोडं चुकल्यासारखे वाटतेय. त्यानंतर ते विक्रेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. त्यानंतर विक्रेत्याला विचारतात कुठे राहतो त्यानंतर तो घाटकोपरला असल्याचे सांगतो.

हेही वाचा – ‘मावळ्यांची शाळा!’ प्रशिक्षकाने विद्यार्थीनींना दिला आत्मरक्षणाचा धडा; Viral Video एकदा पाहाच

विक्रेत्याला खूश करण्यासाठी अनुपम खेर यांनी गरज नसतानाही कंगवा विकत घेतला आणि एका कंगव्यासाठी राजूला ४०० रुपये दिले, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. मात्र, हा कंगवा स्वीकारण्यात अभिनेताही कचरत होता, मात्र विक्रेत्याने त्यासाठी आग्रह केल्याने त्यांनी कंगवा खरेदी केला. अभिनेत्याने त्याच्याकडून कंगवा विकत घेतल्यानंतर राजू काकांच्या चेहऱ्यावरही थोडा हसू येते दिसत होता. त्यांनी अभिनेत्याशी आपली अनुभव देखील शेअर केली आणि सांगितले की,”तो कंगवा विकण्यासाठी वांद्रे ते अंधेरीपर्यंत चालत आला” आणि शेवटी त्याने अभिनेत्याला ओळखले. व्हायरल व्हिडीओ फारच गोंडस आहे. कंगवा विक्रेत्याचा प्रामाणिकपणा आणि अनुपम खैर यांच्या दिलदारपणामुळे हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.