शानेद केन या ३५ वर्षीय महिलीनं सलग १२ तास ट्रेडमिलवर धावून नवा विश्वविक्रम साधला आहे. शानेद दृष्टीहिन आहे. सलग १३० किलोमीटर ती धावली. तिनं यापूर्वीही अनेक विक्रम केले आहेत.

शानेदनं लहानपणीच आपली दृष्टी गामावली होती. पण, दृष्टी नसली तरी तिला हार मात्र मानायची नव्हती. दृष्टीहिन व्यक्तीही इतरांपेक्षा कमी नाही हे तिला जगाला दाखवून द्यायचं होतं म्हणूनच तरुण वयातच तिने स्वत:वर मेहनत घ्यायला सुरूवात केली. यासाठी तिचे प्रशिक्षक जॉन ओरिगन यांनी तिच्यावर प्रचंड मेहनत घेतली. तिही अशा प्रकारचे विक्रम करू शकते हा विश्वास त्यांनी दिला. गेली कित्येक वर्षे ती धावण्याचा सराव करत होती. ट्रेडमिलवर सलग १२ तास धावून तिनं १३० किलोमीटर अंतर कापलं त्यामुळे तिच्या नावाची नोंद गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.

VIDEO : घराखाली लपलेल्या 8 किलो वजनाच्या अजगराला जिंवत पकडून तिने आणलं बाहेर

वाचा : भारतातील पत्ते शोधणे होणार सोपे; गुगल मॅपमध्ये खास बदल

सात खंडात, सात मॅरेथॉन शर्यत पूर्ण करणारी २०१७ मधली शानेद ही पहिली दृष्टीहिन महिला ठरली. तिच्या नावावर आणखी दोन गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड जमा आहे.