Premium

प्लीज, डिजनीलँड हैदराबादला आणण्याचा विचार करा! चिमुकलीची मंत्र्यांकडे मागणी; Video होतोय व्हायरल…

सोशल मीडियावर एका चिमुकलीने व्हिडीओत मजेशीर मागणी केली आहे.

Bring Disneyland to Hyderabad girl requests to hyderabad minister then minister responds with tweet
(सौजन्य:ट्विटर/@KTRBRS) प्लीज, डिजनीलँड हैदराबादला आणण्याचा विचार करा! चिमुकलीची मंत्र्यांकडे मागणी; Video होतोय व्हायरल…

डिजनी (Disney) हे नाव अगदी प्रत्येक लहान मुलाच्या ओळखीचे आहे. मिकी माऊस, बार्बी, ट्वीटी आदी अनेक कार्टूनने सजवलेलं डिजनीचं हे थीम पार्क हाँगकाँगमधील डिजनीलँड जगप्रसिद्ध आहे. या पर्यटन स्थळाला अनेक पर्यटक भेट देतात. तर सध्या सोशल मीडियावर चिमुकलीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. चिमुकली तेलंगणाच्या मंत्र्यांकडे अनोखी मागणी करताना दिसून आली आहे, जे पाहून तुमच्याही चेहऱ्यावर नक्कीच आनंद येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

@visurendra यांच्या एक्स (ट्विटर) पोस्टद्वारे एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सुरेंद्र विनायकम असे या युजरचे नाव असून त्यांची लेक एक अनोखी मागणी करताना दिसते आहे. चिमुकलीने ही मागणी तेलंगणाचे मंत्री के. टी. रामाराव यांच्याकडे केली आहे. चिमुकलीने डिजनीलँड हैदराबादला आणण्याचा विचार करण्याची विनंती मंत्र्याकडे केली आहे. तेलंगणाच्या मंत्र्यांकडे चिमुकलीने कोणती मागणी केली, एकदा तुम्हीसुद्धा पोस्टमधून बघा.

हेही वाचा…“आई मला अभ्यास नको फक्त खायला हवं” अभ्यास करुन कंटाळलेल्या चिमुकल्याचा VIDEO व्हायरल

व्हिडीओ नक्की बघा :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, एक चिमुकली व्हिडीओत एक अनोखी मागणी करताना दिसते आहे. ‘हॅलो केटीआर मामा!’ प्लीज, डिजनीलँडला हैदराबादला आणण्याचा विचार करा’, असे बोलताना दिसत आहे. हा एक्स (ट्विटर) वरील व्हायरल व्हिडीओ पाहून तेलंगणाच्या मंत्र्यानेही या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘बेटा वचन देऊ शकत नाही, पण मी प्रयत्न करेन’; असे कॅप्शन लिहून त्यांनी हा व्हिडीओ रिपोस्ट केला आहे.

सोशल मीडियावर ही पोस्ट १५ नोव्हेंबरला @visurendra यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली. तर @KTRBRS यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून काल ही रिपोस्ट करण्यात आली आहे. तसेच ‘तेलंगणा निवडणुकीबाबत माझ्या मुलीची केटीआरला अनोखी विनंती’, असे कॅप्शन युजरने या व्हिडीओला दिले आहे. चिमुकलीच्या या खास मागणीने सोशल मीडियावरील नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bring disneyland to hyderabad girl requests to hyderabad minister then minister responds with tweet asp

First published on: 29-11-2023 at 18:31 IST
Next Story
बँकॉकला निघालेल्या नवरा बायकोची विमानातच खडाजंगी! दिल्लीच्या हद्दीत विमान येताच..अनोख्या प्रवासाची गोष्ट