“नजर हटी, दुर्घटना घटी!” अशा आशयाचे फलक हायवेवर वाहन चालवताना तुम्ही नेहमी पाहिले असतील. वाहन चालवताना चालकाचे सर्वत्र नजर असावी लागते अन्यथा खरोखर अपघात होऊ शकते. असेच काही उत्तर प्रदेशातील झाशी येथील कार चालकाच्या बाबतीत घडले आहे. एका अरुंद रस्त्यावर कार मागे घेत असताना चालकाने थेट एका व्यक्तीच्या अंगावर कार चढवली आहे. थरारक अपघातमध्ये व्यक्ती कारसह मागे पुढे फरफटत असल्याचे दृश्य सीसीटिव्हीमध्ये कैद झाले आहे. सोशल मीडियावर हे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे. सुदैवाने व्यक्तीचा जीव वाचला आहे. एवढा भयानक अपघातानंतरही व्यक्तीचा जीव कसा वाचला याचे अनेकांना आश्चर्य वाटत आहे.

सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या एका घटनेत, गॅस एजन्सी चालक प्रेमगंज कॉलनी परिसरात रस्त्यावर कारची धडक लागताच एक व्यक्ती जमिनीवर खाली पडतो . कार चालक कार मागे घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण कार मागे घेताना त्याने एका व्यक्तीला धडक दिल्याचेही चालकाला जाणवले नाही. तो तसाच कार मागे घेत होता त्यामुळे जमिनीवर पडलेला व्यक्ती कारच्या मागच्या बाजूने खाली गेला. व्हिडीओमध्ये दिसते की व्यक्तीचे कारच्या समोरच्या बाजूने बाहेर आल्याचे दिसते. व्यक्ती जोरजोरात ओरडत आहे त्याच्या किंकाळ्या ऐकून वाटसरू त्याच्याकडे धावत येतात आणि ड्रायव्हर त्याची गाडी पुढे सरकवतो. रस्त्यावर पडलेल्या रक्तबंबाळ माणसाला गाडी पुढे गेल्यावर पुन्हा काही फूट पुढे-मागे ओढूले जाते.

हेही वाचा –‘फक्त पापड नव्हे, राजस्थानच्या तापलेल्या वाळूत अंडही निघालं उकडून!’, बीएसएफ जवानाचा नवा Video Viral

स्थानिकांच्या मध्यस्थीने वाहन थांबल्यानंतर, रस्त्यावरून जाणाऱ्या जखमी व्यक्तीला बाहेर काढतात. व्यक्तीला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून रक्तस्त्राव होत असल्याचे दिसत आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने स्थानिक समुदायामध्ये हळहळ व्यक्त केली, रहिवाशांनी आरोपींवर कारवाई करण्याची आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी गॅस एजन्सी ऑपरेटरला त्वरित न्याय मिळावा अशी मागणी केली.

हेही वाचा – “सजा हैं काजल मेरी आखों में आज…”, जगभरात धुमाकूळ घालणारं ‘गुलाबी साडी’ गाण्याचं हिंदी व्हर्जन ऐकलं का? नसेल तर येथे ऐका

व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. नेटकऱ्यांनी कारचालकाला शिक्षा देण्याची मागणी केली आहे.