संयुक्त अरब अमिरातची (UAE) राजधानी दुबईमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. दुबईतील रस्ते, घरे आणि मॉल्स जलमय झाले होते. सोशल मीडियावर पुराचे भयावह व्हिडीओ समोर येत आहे. लोक जीव मुठीत घेऊन पुराचा सामना करत आहे. जिथे माणासांचा जीव धोक्यात आला आहे तिथे मुक्या प्राण्यांची काय अवस्था झाली असेल याची कल्पना करूनही अंगावर काटा येतो . दरम्यान दुबईमध्ये पुरात अडकेल्या मांजरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मांजरा जीव कसा वाचवला आहे या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता

दुबई सरकारच्या मीडिया ऑफिसने बुधवारी पोस्ट केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दुबईच्या पुराच्या पाण्यात बुडलेल्या कारच्या दाराला एक मांजर लटकलेली दिसते आहे. ही मांजर जीव मुठीत घेऊन तिथे लटकली आहे. तिला जीव वाचवण्यासाठी काहीच हालचाल करता येत नाही.त्यानंतर बोटीवर आलेल्या दुबई पोलिस कर्मचाऱ्यांनी मांजरीच्या पिल्लाची सुटका केली. व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा – “आयुष्याचे दुसरे नाव संघर्ष…”, UPSC परीक्षेत यश न मिळालेल्या उमेदवाराची पोस्ट तुफान व्हायरल, यशापेक्षा अपयशाची चर्चा जास्त

मंगळवारी UAEच्या दुबईमध्ये सुमारे २५९.५ मिलिमीटर पाऊस पडल्यानंतर मध्य पूर्वेतील आर्थिक केंद्र असलेल्या दुबईतील महामार्ग पुरामुळे ठप्प झाले होते, ही आकेडवारी ७५ वर्षांपूर्वी पडलेल्या पावसानंतर आतापर्यंतचा सर्वाधिक जास्त आहे. सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या फुटेजमध्ये दुबईमध्ये बुडलेल्या आणि सोडलेल्या अनेक गाड्या दिसत आहेत.

विक्रमी पावसानंतर दुबई विमानतळावर गोंधळाची स्थिती

मुसळधार पावसामुळे जगातील सर्वात व्यस्त दुबई विमानतळांवर आंतरराष्ट्रीय वाहतुकीच्या दृष्टीने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक उड्डाणे उशीर झाली, काही रद्द झाली आणि काहींचे मार्ग बदलण्यात आले. प्रवाशांना “अत्यावश्यक असल्याशिवाय” विमानतळावर न येण्याचा इशारा देण्यात आला होता.

हेही वाचा – भांडी घासावी लागू नये व्यक्तीने शोधला भन्नाट जुगाड! हर्ष गोयंकांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ

दुबई विमानतळाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “उड्डाणाला विलंब आणि उड्डाणाचे मार्ग बदल सुरूच आहे.” दुबईच्या एमिरेट्स एअरलाईनने सर्व चेक-इन रद्द केले कारण कर्मचारी आणि प्रवाशांना प्रवेशासाठी आणि बाहेर जाण्यासाठी लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. प्रवेश मार्गावर खूप पाणी साचले आहे. दुबईतील शाळाही पुढील आठवड्यापर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.