Viral Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एका हत्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक हत्ती तुफान डान्स करताना दिसत आहे. तुम्ही कधी हत्तीला डान्स करताना पाहिले का? जर नाही, तर हा व्हिडीओ पाहा.
अनेक जण सोशल मीडियावर प्राण्यांवरील प्रेम व्यक्त करत पाळीव प्राण्यांचे व्हिडीओ शेअर करत असतात. कुत्रा मांजरीचे व्हिडीओ तुम्ही अनेकदा पाहिले असेल पण हत्तीचा असा डान्स करतानाचा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा डान्स व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक हत्ती डान्स करताना दिसत आहे. ‘कावलया’ या लोकप्रिय गाण्यावर हा हत्ती सुंदर डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की हत्तीने सुंदर पेहराव घातला आहे. या सुंदर पेहरावात हत्ती खूप आकर्षक दिसत आहे. हत्तीचा डान्स पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. हत्ती या गाण्यावर सुंदर स्टेप्स करत नाचताना दिसत आहे. रस्त्याच्या आजुबाजूला लोकं हत्तीचा डान्स बघत आहे.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “विश्वास बसत नाही की हत्ती एवढा सुंदर डान्स करतोय” तर एका युजरने लिहिलेय, “आपल्या फायद्यासाठी प्राण्यांचा वापर करू नका” आणखी एका युजरने लिहिलेय, “हत्ती माझ्यापेक्षा छान डान्स करतोय” काही युजर्सनी हा बनावटी हत्ती असल्याचा दावा केला आहे. एका युजरने लिहिलेय, “हा बनावटी हत्ती असून दोन माणसं हत्तीचा पेहराव घेऊन डान्स करत आहे” अनेकांनी हा हत्ती बनावटी असल्याचे लिहिलेय.

हेही वाचा : अनंत अंबानींचं लक्झरी घड्याळ पाहून झुकरबर्गची पत्नी थक्क; किंमत इतकी की मुंबईत घ्याल सी फेसिंग घर

anil.arts या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कावलया” लोकांच्या प्रतिक्रिया पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. कारण व्हिडीओत हत्तीच डान्स करत असल्याचे दिसतेय पण जेव्हा तु्म्ही नीट निरिक्षण कराल तर कदाचित तुम्हाला हा खरा हत्ती नसून दोन माणसे हत्तीचा पेहराव घालून नाचत असल्याचे वाटेल. मनोरंजन आणि पोटापाण्यासाठी अनेक जण अशा प्रकारची कला दाखवताना दिसतात.