देशात लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून प्रत्येक पक्ष तयारीला लागला आहे. यात कोलकत्ता, तामिळनाडूमध्येही निवडणुकांसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. यात सोशल मीडियावर सध्या भाजपाविरोधातील रॅलीचा एक फोटो प्रचंड व्हायरल होतोय. यात फोटोत ‘No Vote to BJP’ अशा बॅनरसह निघालेली एक रॅली दिसतेय, या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘Tamilnadu_Rejects_BJP’ असा हॅशटॅग वापरण्यात आला आहे. ज्यामुळे फोटो तामिळनाडूतील असल्याचा दावा केला जात आहे. पण खरंच तामिळनाडूमध्ये भाजपाविरोधात अशी कोणती रॅली काढण्यात आली होती का? आणि हा व्हायरल फोटो कधीचा आहे? यामागचं सत्य जाणून घेऊ..

लाइटहाऊस जर्नलिझमला तपासादरम्यान आढळले की, शेअर केलेला फोटो जुना आहे आणि तो तामिळनाडूचा नाही तर कोलकात्यामधील आहे.

nature-loving rickshaw driver put Plants in rickshaw
“किती सुंदर दादा!”, निसर्गप्रेमी रिक्षचालकाचा हटके जुगाड पाहून प्रवासी झाले खुश, व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच
Draupadi murmu
भाजपाकडून पुन्हा राष्ट्रपतींचा अवमान? सोशल मीडियावर ‘तो’ फोटो व्हायरल; विरोधकांच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर!
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
rahul gandhi sanjay nirupam
“काँग्रेसने त्यांची उरलीसुरली ऊर्जा…”, संजय निरुपमांचा घरचा आहेर; म्हणाले, “माझ्यावर स्टेशनरी खर्च करू नका, मी उद्या…”

काय होत आहे व्हायरल?

एक्स यूजर Dr Gaurav Kumar ने खालील व्हायरल फोटो आपल्या प्रोफाइलवर शेअर केला आहे.

या पोस्टचा आर्काइव्ह व्हर्जन बघा.

https://archive.ph/FXS02

इतर युजर्स देखील तोच फोटो शेअर करत करुन असा दावा करतायत की, हा फोटो अलीकडील आहे.

तपास:

यानंतर आम्ही इमेजवर रिव्हर्स इमेज सर्च करून फोटो नेमका कधीचा आहे याचा तपास सुरू केला.

इंडिया टुडेच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या लेखात आम्हाला हा फोटो सापडला. हा लेख ‘पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१’ या टॅगखाली अपलोड करण्यात आला होता. लेखाचे शीर्षक होते (भाषांतर): ‘भाजपला मत नाही’: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी निषेध रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

https://www.indiatoday.in/elections/west-bengal-assembly-polls-2021/photo/no-vote-to-bjp-activists-raise-slogans-during-protest-rally-ahead-of-west-bengal-assembly-polls-1777854-2021-03-10/1

या फोटोवर Press Trust of India (PTI) असे क्रेडिट्स होते.

आम्हाला नॅशनल हेराल्डमधील एका लेखात देखील असा फोटो आढळला.

https://www.nationalheraldindia.com/india/no-vote-to-bjp-echoes-in-kolkata-to-be-heard-across-bengal

आम्हाला हाच फोटो groundreport.in च्या वेबसाइटवर देखील मिळाला.

आम्हाला ‘शटरस्टॉक’ या स्टॉक इमेज वेबसाइटवरही असाच एक फोटो आढळून आला.

https://www.alamy.com/people-shouts-slogan-carry-placards-banners-during-anti-rss-bjp-rally-before-election-in-kolkata-india-10-march-2021-photo-by-indranil-adityanurphoto-image489501427.html

कॅप्शन मध्ये नमूद केले होते (भाषांतर): १० मार्च २०२१ रोजी कोलकाता येथे आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत “भाजपला मत देऊ नका” या मागणीसाठी विद्यार्थी आणि नागरिक मंचाने कोलकाता येथे भाजपा आणि RSS विरोधात निषेध रॅली काढली.

निष्कर्ष

२०२१ मध्ये पश्चिम बंगालमधील रॅलीतील जुने फोटो तामिळनाडूमधील असल्याचा दावा करत आताचे असल्याचे सांगून शेअर करण्यात येत आहे. त्यामुळे व्हायरल फोटो आणि त्यात केलेला दावा खोटा आहे.