सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. अनेकदा बनावटी किंवा जुने व्हिडीओ व्हायरल होतात आणि त्यामुळे अनेकदा गैरसमज निर्माण होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीवर हल्ला करताना दिसताहेत. येत्या निवडणूकीचा प्रचार करणाऱ्या एका भाजप नेत्यावर लोकांनी हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. खरंच निवडणुकीचा प्रचार करताना भाजप नेत्यावर हल्ला झाला का? या व्हायरल व्हिडीओमागील सत्य आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर BeatalPret ने त्याच्या अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला.

या पोस्टचे अर्काइव्ह व्हर्जन येथे पाहा .

https://web.archive.org/web/20240412062745/https://twitter.com/beatalPret/status/1778364062570852637

इतर युजर्सनी सुद्धा अशाच प्रकारचा दावा करत सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केले आहेत.

तपास – आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून तपास सुरू केला आणि टूलमधील डिटेल्ड व्यू वापरून व्हिडिओच्या अनेक किफ्रेम मिळवल्या.

दाव्यावर रिव्हर्स इमेज सर्च वापरल्यावर, आम्हाला odishatv.in वर प्रकाशित एक बातमी दिसली.

https://odishatv.in/news/miscellaneous/mla-prashant-jagdev-will-be-arrested-soon-after-treatment-central-range-ig–172594

या बातमीमध्ये असे सांगण्यात आले आहे की व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती चिल्का येथील बिजू जनता दलचे निलंबित आमदार प्रशांत जगदेव आहे. त्यांच्या वाहनाने जमलेली लोक चिरडली होती.

आम्हाला आणखी एक बातमी सापडली ज्यामध्ये म्हटले आहे की, चिल्काच्या आमदाराने त्यांचे वाहन लोकांवर चढवल्यामुळे २२ लोक जखमी झाले, त्यानंतर या नेत्यावर हल्ला करण्यात आला.

https://indianexpress.com/article/cities/bhubaneswar/odisha-22-injured-bjd-mla-rams-car-crowd-leader-assaulted-later-7816667/

या बातमीत घटनेच्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेण्यात आला आहे.

आम्हाला या घटनेचा व्हिडिओ सापडला, जिथे तो लोकांना जखमी करताना दिसत होता, जो OTV ने X वर अपलोड केला होता.

https://twitter.com/otvnews/status/1502532676410089472

हा व्हिडिओ १२ मार्च २०२२ रोजी अपलोड करण्यात आला होता.

गूगल किवर्डनी शोधल्यानतर आम्हाला कलिंग टीव्हीच्या युट्यूब चॅनेलवर व्हिडिओमधील व्हिज्युअल्स मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात असल्याचे समजले. हा व्हिडिओ २ वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आला होता.

आम्हाला आणखी एक बातमी सापडली, ज्याद्वारे निलंबित आमदार प्रशांत जगदेव यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात पक्षात प्रवेश केल्याचे समजले.

https://www.newindianexpress.com/states/odisha/2024/Mar/01/expelled-bjd-mla-prasant-jagdev-joins-bjp

येत्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका भाजप नेत्यावर लोकांनी हल्ला केल्याचा दावा खोटा असल्याचे आम्हाला समजले.

निष्कर्ष: बिजू जनता दलचे निलंबित आमदार प्रशांत जगदेव यांनी त्यांच्या वाहनाने जमलेली लोक चिरडली होती. या वेळी २२ जण जखमी झाले होते त्यानंतर त्यांना मारहाण केल्याचा जुना व्हिडिओ आता निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप नेत्यावर नुकताच झालेला हल्ला म्हणून व्हायरल होत आहे. हा दावा खोटा आहे.