Premium

Gautami Patil : “दिल है छोटा सा…” गौतमी पाटीलने केला चिमुकल्याबरोबर डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

सध्या गौतमीचा असाच एक डान्स व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कारण या व्हिडीओमध्ये गौतमीने चक्क एका चिमुकल्याबरोबर डान्स केला आहे. हा डान्स व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

Gautami Patil danced with child
Gautami Patil : "दिल है छोटा सा…" गौतमी पाटीलने केला चिमुकल्याबरोबर डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल (Photo : official_gautami941__ /Instagram)

Gautami Patil Dance Video : गौतमी पाटील एक उत्तम डान्सर म्हणून ओळखली जाते. तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर ती सतत चर्चेत असते. तिचे अनेक डान्स व्हिडीओ, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवर व्हायरल होत असतात. तिच्या डान्स व्हिडीओवर चाहते नेहमी कौतुकांचा वर्षाव करतात.
सध्या असाच एक डान्स व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कारण या व्हिडीओमध्ये गौतमीने चक्क एका चिमुकल्याबरोबर डान्स केला आहे. हा डान्स व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हायरल व्हिडीओ गौतमीच्या एका कार्यक्रमातील आहे. गौतमी स्टेजवर डान्स करत आहे. अचानक स्टेजवर एक मुलगा येतो आणि डान्स करायला सुरुवात करतो. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की हा चिमुकला हात वर करून डान्स करताना दिसत आहे. त्याच्यामागे उभी असलेली गौतमीसुद्धा त्याच्याबरोबर डान्स करताना दिसत आहे.
ती त्या चिमुकल्याचे हात वर धरून त्याच्याबरोबर डान्सचा आनंद घेताना व्हिडीओत दिसेत आहे. गौतमीचा चिमुकल्याबरोबरचा हा डान्स व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Pune Video : फक्त पुणेकरच नाही तर पुण्यातील गाईसुद्धा पाळतात ट्रॅफिक नियम, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच

official_gautami941__ या तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर “दिल है छोटा सा…” हे गाणे लावले आहे. या अकाउंटवर ती तिचे अनेक डान्स व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते.
महाराष्ट्रभर गौतमी अनेक कार्यक्रम करते. तिच्या कार्यक्रमाला लाखो प्रेक्षक हजेरी लावतात. डान्समुळे गौतमीची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gautami patil danced with child video goes viral on instagram dancer gautami patil new video ndj

First published on: 28-09-2023 at 13:11 IST
Next Story
“कठीण प्रसंगी…” भरधाव रेल्वेमध्ये अडकला तरीही धीर नाही सोडला; घोड्याचा VIDEO शेअर करत IAS अधिकाऱ्याने दिला मोलाचा संदेश, म्हणाले…