मुलांची मारामारी ही काय नवीन गोष्ट नाही. पण, गेल्या काही वर्षांमध्ये मुलींची आणि महिलांच्या हाणामारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडयावर व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड होऊ लागेल याचा काही नेम नाही. आता हेच पाहा, सोशल मीडियावर मुलींच्या भांडणाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. असे व्हिडीओ सोशल मीडियावर लोकांना प्रचंड आवडतात. सध्या सोशल मीडियावर मुलींच्या हाणामारीचा एक व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे.

छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील मुलींचा रस्त्यावर भांडण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिल्ह्यातील रिव्हर व्ह्यू येथे शुक्रवारी (५ एप्रिल) मुलींच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. व्हिडीओमध्ये मुली एकमेकांचे केस ओढताना आणि एकमेकींना धक्काबुक्की करताना दिसत आहेत. यावेळी रिव्हर व्ह्यू येथे सर्वसामान्य जनता जमा झाली, मात्र लढणाऱ्या मुलींची सुटका करण्याचे धाडस कोणी दाखवले नाही.

वास्तविक, हा व्हायरल व्हिडीओ छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील आहे, जिथे शुक्रवारी परस्पर वादामुळे मुलींमध्ये जोरदार भांडण झाले. वाद इतका वाढला की, मुलींमध्ये लाथा-बुक्क्याही सुरू झाल्या. या मुली एकमेकींना लाथा बुक्के मारत केस ओढत तुफान हाणामारी करताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत. भररस्त्यात मुलींचा राडा पाहून आजूबाजूचे लोकही थबकतात. या काळात मारहाण झालेल्या मुलींनाही किरकोळ दुखापत झाली. कोतवाली परिसरातील रिव्हर व्ह्यू चौपाटीजवळ ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या मुलींमध्ये नेमकं असं काय भांडण झालं की या मुली थेट भररस्त्यात हाणामारीवर उतरल्या, याबाबत अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेबाबत सध्या पोलिसांकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

(हे ही वाचा : डोक्यावर पदर अन् बारावी पास, गावातील गृहिणीचे फाडफाड इंग्रजी ऐकून तोंडात बोटेच घालाल; Video एकदा पाहाच)

येथे पाहा व्हिडिओ

नुकताच असाच प्रकार अंबिकापूर, सुरगुजा येथे उघडकीस आला. शहरातील कलाकेंद्र मैदानाजवळ मुलींच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यावेळी मुली केस पकडून एकमेकांना मारताना दिसल्या. मात्र, घटनास्थळी उपस्थित काही तरुणांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण शांत झाले. या प्रकरणाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.