सोशल मीडिया माध्यमांवर एका कार्यक्रमाचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असल्याचे, लाईटहाऊस जर्नालिजमला आढळले आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये लोक कार्यक्रमाच्या ठिकाणी तोडफोड करताना दिसत आहेत. हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांच्या नुकत्याच झालेल्या कार्यक्रमाचा हा व्हिडीओ असल्याचा दावा युजर्सकडून करण्यात येत आहे.

मात्र, या व्हिडीओच्या तपासादरम्यान असे लक्षात आले की, हा व्हिडीओ जुना असून ‘किसान महापंचायत’च्या जुन्या कार्यक्रमाशी संबंधित आहे. नेमके काय व्हायरल होत आहे, त्यामागील सत्य काय जाणून घेऊ.

काय होत आहे व्हायरल?

एक्स [पूर्वीचे ट्विटर] युजर, दिलीप वर्माने हा व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइलवरून शेअर केला आहे.

या पोस्टचे आर्काइव्ह व्हर्जन पाहा :

https://ghostarchive.org/archive/Szvcg

सोशल मीडिया माध्यमावर इतर वापरकर्तेदेखील असाच दावा करत हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास :

व्हायरल व्हिडीओमधून मिळवलेल्या कीफ्रेमवर [keyframe], रिव्हर्स इमेज सर्च करण्यात आले. असे केल्याने १२ जानेवारी २०२१ रोजी एक्सवर अपलोड केलेला एक व्हिडीओ सापडला.

या व्हिडीओमध्ये एक विशिष्ट कीफ्रेम सापडली, जिथे फाटलेल्या बोर्डवर ‘किसान महापंचायत’ लिहिलेले होते. त्यामुळे या व्हिडीओने सिद्ध होते की, हा व्हिडीओ २०२१ चा आहे.

त्यानंतर अधिक तपासासाठी, “Kisan Mahapanchayat” “2021” “stage” “vandalised” अशा गूगल टेक्स्ट सर्च टर्म्सचा, शब्दांचा वापर केला. असे केल्याने या घटनेशी संबंधित अधिक बातम्या सापडण्यास मदत झाली.

आम्हाला इंडिया टुडेच्या वेबसाइटवर या संबंधी एक बातमी सापडली.

बातमीत असे नमूद करण्यात आले होते की, कर्नालच्या घटनेबद्दल ७१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि याचा निषेध करणाऱ्या शेतकऱ्यांनी ‘किसान महापंचायत’ स्थळाची तोडफोड केली होती.

https://www.onmanorama.com/news/india/2021/01/10/farmers-vandalise-venue-of-haryana-cm-kisan-mahapanchayat-in-kar.html

अहवालात असे नमूद केले आहे की : आंदोलक शेतकऱ्यांनी किसान महापंचायतीच्या ठिकाणी तोडफोड केली, जिथे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर केंद्राच्या तीन कृषी कायद्यांचे फायदे अधोरेखित करण्यासाठी लोकांना संबोधित करणार होते.

https://www.rediff.com/news/report/pix-haryana-cops-use-teargas-against-farmers/20210110.htm

यासह, ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या यूट्यूब चॅनेलवर तीन वर्षांपूर्वी अपलोड केलेला व्हिडीओसुद्धा आम्हाला आढळला.

निष्कर्ष :

वरील सर्व तपास लक्षात घेता असे समोर येते की, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या कार्यक्रमात अलीकडेच शेतकऱ्यांनी तोडफोड केल्याचा दावा करत जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो दावा खोटा आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ, हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या कर्नाल येथील ‘किसान महापंचायत’च्या कार्यक्रमाच्या स्थळाची तोडफोड करणाऱ्या शेतकऱ्यांचा जुना व्हिडीओ असल्याचे सिद्ध होते.