सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात जे लोकांचे मनोरंजन करतात. सोशल मीडियावर दररोज नृत्य आणि अभिनयाशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होतात, तर काही व्हिडीओ आपल्याला पोट धरून हसायलादेखील भाग पाडतात. काही व्हिडीओमधून तर शिकायलादेखील मिळतं. पण, काही वेळा असे काही व्हिडीओ व्हायरल होतात जे लोकांना सतर्क करण्यास मदत करतात. आजपर्यंत तुम्हीही असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पण, आता एक नवीन व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की, दुकानदाराला कसे लुटले जाऊ शकते. व्हिडीओमध्ये काय दाखवण्यात आलं आहे, ते जाणून घेऊया…

लुटण्याचा हा एक नवीन मार्ग

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला दुकानात बसलेली दिसत आहे. तिथे एक माणूस येतो आणि महिलेला म्हणतो, “दीदी, मला पाच हजार रुपये रोख हवे होते, ते मिळतील का?” त्यावर उत्तर देताना महिला हो मिळतील असे सांगून, पण त्यासाठी तुम्हाला ५० रुपये अधिक द्यावे लागतील; असे त्या व्यक्तीला सांगते. यानंतर महिला त्याला देण्यासाठी पैसे मोजायला लागते. तेवढ्यातच तो माणूस त्या स्त्रीला म्हणतो की, त्याला एक परफ्यूमही हवा आहे आणि यानंतर तो महिलेच्या हातावर परफ्यूम शिंपडतो आणि म्हणतो, “हे पाहा, मला असा परफ्यूम हवायं.” त्या परफ्यूमचा वास आल्यानंतर काही वेळातच ती महिला बेशुद्ध पडते. यानंतर ती व्यक्ती महिलेच्या हातून पैसे घेते आणि पळून जाते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

(हे ही वाचा : रेल्वे रुळावर अडकला ट्रक, काही मिनिटांत सुस्साट वेगात आली ट्रेन अन्… अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल )

व्हायरल व्हिडीओ येथे पाहा

लोकांना सतर्क करण्यासाठी @SjSingh66 नावाच्या अकाउंटद्वारे मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वी ट्विटर)वर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. पण, लोकांनी याला विनोद म्हणून घेत मजेदार कमेंट्स केल्या. एका वापरकर्त्याने लिहिले, “व्यवसायासाठी ही नवीन कल्पना.” तर काही लोकांनी विचारले, हे काय आहे? याला उत्तर देताना अकाउंट युजर म्हणाला की, “हा लुटण्याचा नवीन मार्ग आहे, यातून काहीतरी शिका आणि सतर्क राहा.”