Railway Crossing Viral Video: मृत्यू कोणासाठी थांबतो का? कधी कधी आपला मूर्खपणाच अशा गोष्टींना कारणीभूत ठरतो. थोडासा निष्काळजीपणाच जीवावर किती बेतू शकतो, हे एका भयंकर व्हिडीओतून समोर आले आहे. रेल्वे ट्रॅक ओलांडू नका, अशा सूचना वारंवार दिल्या जाऊनही अनेक जण नेमकी तीच कृती करण्याचा धोका का पत्करतात हेच कळत नाही. रेल्वे अपघात हा सर्वांत भयंकर मानला जातो. कारण- नशीब बलवत्तर असेल, तरच माणूस त्यातून वाचू शकतो. रेल्वेगाड्यांचा वेग खूप जास्त असल्याने तिने उडवल्यास एक सेकंदाच्या आत त्या व्यक्तीची चटणी होऊ शकते. ट्रेनच्या नुसत्या हवेनेसुद्धा माणसे उडून अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तुम्ही इंटरनेटवर रेल्वे अपघातांचे याबाबतचे कितीतरी व्हिडीओ पाहू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अपघात टाळण्यासाठी रेल्वे क्रॉसिंगवर गेट बसविले जातात. मात्र, घाईमुळे लोकांना जीव गमवावा लागतो. रेल्वे क्रॉसिंगवरील अपघातांचे व्हिडीओ दररोज व्हायरल होतात. तरीही लोक त्यांच्यापासून धडा घेत नाहीत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यामध्ये रेल्वे क्रॉसिंगवर एका ट्रकला ट्रेनने जोरदार धडक दिल्याचे पाहायला मिळत आहे.

(हे ही वाचा : तुफान राडा! भर रस्त्यात मुलींची दे दणादण हाणामारी; लाथा-बुक्क्यांनी मारलं, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, अन्… Video व्हायरल )

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडीओ पाहून तुम्ही विचलित होऊ शकता. या व्हिडीओमध्ये एक ट्रक रेल्वे क्रॉसिंगवर उभा असल्याचे दिसत आहे. भरधाव वेगाने येणारी एक प्रवासी ट्रेनने रेल्वे क्रॉसिंगवर उभ्या असलेल्या ट्रकच्या धडकेमुळे ट्रकचे तुकडे झाले. ही धडक इतकी जोरदार होती की, लांबवर जाऊन पडला आणि रेल्वे क्रॉसिंगचे फाटकही तुटले. ट्रकची अवस्था पाहून त्यामध्ये बसलेल्या लोकांच्या स्थितीचा अंदाज येतो. व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून, त्यावर लोक विविध प्रकारच्या कमेंट्स करीत आहेत.

येथे पाहा व्हिडिओ

हा व्हिडीओ dedenmnf_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; जो आतापर्यंत २८ दशलक्षांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि एक दशलक्षाहून अधिक वेळा लाइक केला गेला आहे. त्यावर लोकांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway track crossing train hits truck at railway crossing video viral pdb
First published on: 08-04-2024 at 11:37 IST