‘हॅप्पी जर्नी’ या चित्रपटातला प्रिया बापटचा संवाद तुम्हाला आठवतोय का? ‘अन्न, वस्त्र, निवारा आणि वायफाय या माझ्या मुलभूत गरजा आहेत’ असे ती आपल्या भावाला सांगते. पण ही फक्त या चित्रपटातील पात्राची गरज नाही तर जगातील अनेकांची गरज बनत चालली आहे.

वायफायची सुविधा पुरवणा-या ‘आयपास’ कडून एक संशोधन करण्यात आले या संशोधनानुसार जगातील अनेक लोकांची सेक्स, दारू आणि इतर गरजांपेक्षा वायफाय ही सर्वात मुलभूत गरज बनली आहे. दर दहा माणसांपैकी चार माणसांची वायफाय ही अत्यंत महत्त्वाची गरज बनली असल्याचे या संशोधनात म्हटले आहे. युरोप आणि अमेरिकेतील जवळपास १७०० लोकांवर हे संशोधन करण्यात आले. यांना अन्न वस्त्र, निवा-यानंतर इतर गरजा विचारण्यात आल्या असता या मूलभूत गरजांनंतर आपल्याला वायफायची सर्वाधिक गरज भासते असे त्यांनी सांगितले. १०० पैकी ४० टक्के लोकांनी वायफायला प्राधान्य दिले आहे.

Akshaya Tritiya 2024
१०० वर्षांनी अक्षय्य तृतीयेला शुभ योग; ‘या’ राशींचे नशीब सोन्याहून अधिक चमकणार? मिळू शकते कोट्यवधींचे मालक होण्याची संधी 
loksatta editorial pm narendra modi controversial statement on muslim community
­­­­अग्रलेख : पंतप्रधानांचे आभार माना!
What was the cause of the Rwandan genocide 30 years ago
१०० दिवसांत ८ लाखांची कत्तल…३० वर्षांपूर्वीच्या रवांडा नरसंहाराचे कारण काय होते? सद्यःस्थिती काय?
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral

इतकेच नाही तर लोक वायफायची उपलब्धता तपासून त्या जागेला प्राधान्य देतात असेही त्यांनी म्हटले आहे. ज्या ठिकाणी मोफत वायफाय उपलब्ध होते अशा ठिकाणी लोक अधिक भेट देतात असेही या संशोधनातून समोर आले आहे. प्रत्येक गोष्टींसाठी इंटरनेटचा वापर वाढला आहे त्यामुळे लोक त्याच्या आहारी गेले आहेत म्हणूनच लोकांच्या गरजामध्ये वायफायचे महत्त्व अधिक असल्याचा निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला.