सध्या नोकरी शोधण्यापासून ते चांगली नोकरी मिळण्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती प्रचंड मेहनत घेत असतात. मात्र, नोकरीसाठी पाठवले गेलेले हजारो अर्ज वाचले जातीलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे नोकरीचा अर्ज हटके पद्धतीने पाठविण्याची युक्ती सध्या अनेक मंडळी करत असल्याचे सोशल मीडियावरून आपण पाहू शकतो. सध्या असाच एक फोटो एक्स [पूर्वीचे ट्विटर] वरून शेअर होत असल्याचे दिसते. यात नेमके काय केले आहे ते पाहा.

“डेव्हिड” नावाच्या एका व्यक्तीने चक्क पिझ्झा डिलिव्हरीबरोबर आपला सीव्ही पाठवला असल्याची पोस्ट सध्या चर्चेत आहे. डेव्हिडने पिझ्झा आणि सीव्हीसह हाताने लिहिलेली एक चिठ्ठीदेखील पाठवली होती. त्या चिठ्ठीमध्ये, सीव्ही पाठविणाऱ्या व्यक्तीला इंजिनियरिंग इंटर्न या पदासाठी नोकरी करण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे. तसेच हा पिझ्झा सीव्ही आणि कामाच्या लिंक पाहण्यासाठी दिलेली लाच असल्याने त्या चिठ्ठीत गमतीत म्हटले आहे. डेव्हिडने चिठ्ठीत नेमके काय लिहिले आहे ते पाहू.

Safe Driving Tips
कारचे गिअर बदलण्यापूर्वी ब्रेक दाबावे की नाही? अपघाताचा धोका टाळण्यासाठी प्रत्येक कार चालकाला ‘हे’ माहित असायलाच हवं!
viagra tablet for dimensia
लैंगिक शक्ती वाढवणारी व्हायग्रा मेंदूसाठी ठरणार फायदेशीर? काय सांगतंय नवीन संशोधन?
bajaj housing finance files drhp for rs 7000 crore ipo
बजाज हाऊसिंग फायनान्सचा ‘सेबी’कडे ७,००० कोटींच्या ‘आयपीओ’साठी प्रस्ताव
Discount deals Tata cars drop pricDiscount deals Tata cars drop prices by up to Rs 60000
बचतची मोठी संधी! टाटा मोटर्सच्या ‘या’ कारवर मिळतेय भन्नाट ऑफर
This method is best for cooking dal
डाळ शिजवण्यासाठी ‘ही’ पद्धत आहे सर्वोत्तम; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…
drinking milk
दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात, तुम्हालाही असे वाटते का? मग समज चुकीचा असू शकतो, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
Nisargalipi Compost making process
निसर्गलिपी : कंपोस्ट निर्मिती
son-in-law, kidnap, marriage,
लग्नाचा खर्च परत मिळविण्यासाठी जावयाचे अपहरण

हेही वाचा : Lok sabha elections : जाणून घ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आणि बॅलेट पेपर्समधील फरक

“हेय, अँटिमेटल टीम, तुम्ही नुकत्याच केलेल्या लाँचबद्दल खूप अभिनंदन. मी अँटिमेटल सेवा कंपनीपासून खूप प्रेरित झालो आहे, कृपया या पिझ्झाचा आपण आस्वाद घ्यावा. या पिझ्झासह मी माझा सीव्ही पाठवला असून मला इंजिनियरिंगच्या इंटर्न पदावर नोकरी करण्याची इच्छा आहे. मी या संधीसाठी प्रचंड उत्सुक असून, ही संधी मिळविण्यासाठी जे आवश्यक असेल ते करण्यास तयार आहे. ता.क. [PS] हा पिझ्झा मी तुम्हाला माझी साईट पाहण्यासाठी लाच म्हणून देत आहे. P.P.S : तुमच्या डॉक्समधील काही लिंक्सचे निराकरण करण्यासाठी मी एक छोटासा PR बनवला आहे”, असे व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये लिहिले आहे.

डेव्हिडच्या या भन्नाट युक्तीवर अँटिमेटलच्या सीईओने “पिझ्झा डिलिव्हरीसह अजून एक सीव्ही आमच्याकडे आलेला आहे. इतकेच नाही तर आमच्या दोन लिंक्सचे निराकरणदेखील केलेले आहे. याला नक्कीच मुलाखतीसाठी बोलावले जाईल”, असे शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. व्हायरल होणाऱ्या या फोटोवर नेटकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत पाहू.

“याला मुलाखत नाही थेट नोकरी द्यायला हवी”, असे एकाने म्हटले आहे.
“इंटर्न्सच्या गुणवत्तेवरून, एखादा स्टार्टअप यशस्वी होईल की नाही याचा अंदाज लावता येऊ शकतो”, असे दुसऱ्याने म्हटले आहे.
“नुकतेच त्याला लिंक्डइनवर ॲड केले आहे”, असे तिसऱ्याने लिहिले.
“पिझ्झा? लगेच नोकरीवर घ्या”, असे चौथ्याने लिहिले.

हेही वाचा : पट्ठ्याने Blinkit चा वापर चक्क नोकरी मिळवण्यासाठी केला! सोशल मीडियावर ‘हा’ Photo होतोय व्हायरल…

एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडियावरील @mprkhrst अकाउंटने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोला आत्तापर्यंत ५८४K व्ह्यूज मिळाले आहेत.