Viral video: आजं युग हे सोशल मीडियाचे युग आहे, अशा परिस्थितीत लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करतात. यामध्यये लोक इतके आहारी गेले आहेत की ते देवालाही सोडत नाहीत. यामुळे मनोभावे भक्तीसाठी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत हिंदूंच्या पवित्र स्थळांपैकी एक असलेल्या केदारनाथमध्ये आजकाल असाच काहीसा प्रकार घडत आहे. काही लोक केदारनाथमध्ये एवढा गोंधळ करतात की तेथील भाविकांना अडचणींचा सामना करावा लागतो.अशातच केदारनाथला भाविक कमी आणि व्हिडीओ बनवण्यासाठी आलेले लोक जास्त दिसतात, अशाच ब्लॉगरना एका व्यक्तीनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात १२ ज्योर्तिलिंगांना विशेष महत्त्व आहे. चारधाम यात्रा करणे हे देखील भारतीय संस्कृतीत पवित्र मानले जाते. केदारनाथ हे चारधाम यात्रेतील एक धाम असून १२ ज्योर्तिलिंगापैकी खूप महत्त्वाचे मानले जाते. केदारनाथचे दरवाजे हे सहा महिन्यांसाठी बंद असतात तर सहा महिने ते भक्तांसाठी उघडले जातात. केदारनाथमधील भौगोलिक परिस्थितीचा विचार करुन हे दरवाजे बंद ठेवले जातात. गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे उघडताच चारधाम यात्रेची सुरुवात होते. दरम्यान, उत्तराखंडच्या स्थानिक वृत्तवाहिनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये केदारनाथचे काही जबाबदार लोक गोंधळ घालणाऱ्यांना फटकारताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये हे लोक ढोल-ताशांच्या तालावर जोरजोरात नाचताना दिसत होते.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, केदारनाथमध्ये ढोल ताशाच्या तालावर काही लोक गोंधळ घालताना दिसत आहेत, अशा स्थितीत एक व्यक्ती त्यांच्यामध्ये येतो आणि त्यांना मारण्यास सुरुवात करतो आणि बाहेर काढतो. त्यातील एकाचा ढोल फेकून देतो आणि म्हणतो की इथे फक्त मंदिराचे ढोल वाजवले जातील, तुम्ही इथे दारू प्यायला आलात का? यानंतर ती व्यक्ती म्हणते, तुम्हाला इथे हे सर्व करण्याची परवानगी कोणी दिली आहे, ज्याने दिली आहे, त्याला माझ्यासमोर आणा. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी असेल तर आधी मला भेटून या. त्या व्यक्तीने पुढे म्हटले की, जर तुम्हाला नशा, गोंधळ, रील काढायची असेल तर कृपया येथे येऊ नका, भविष्यात असे घडल्यास सर्वांना मारहाण होईल. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामुळे युजर्समध्ये चर्चेला उधाण आले आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> प्रसिद्धीसाठी अपहरणाचा केला प्रँक; चिमुकल्यांना गाडीत बसवलं अन्… VIDEO व्हायरल होताच पोलिसांनी घेतली दखल

@GaurangBhardwa1 नावाच्या एकास अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत १ लाख ७८ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर व्हिडिओला ३ हजारांहून अधिक वेळा लाईक करण्यात आले आहे. यावर युजर्स कमेंटही करत आहेत. एका युजरने लिहिले…धर्माला व्यवसाय बनवले आहे, भाईसाहेब हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या यूजरने लिहिले… अगदी बरोबर, हे लोक भक्तीपेक्षा ढोंगासाठी जास्त येतात. तर दुसऱ्या युजरने लिहिले… तुम्ही कोणत्याही भक्ताचा न्याय करू शकत नाही, प्रत्येकजण सारखा नसतो, प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत वेगळी असते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kedarnath viral video a person reprimanded group who were making noise in hill area char dham yatra srk