Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून तर वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण डान्सचे व्हिडीओ शेअर करत असतात. सध्या असाच एक डान्सचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये काही चिमुकल्या मुली सुंदर डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल..

डान्स ही अशी कला आहे जी प्रत्येकाला आवडते. मनसोक्त डान्स करताना चेहऱ्यावर आपोआप आनंद दिसून येतो. असं म्हणतात डान्स केल्याने मन प्रसन्न राहते पण अनेकदा इतर लोकांचा सुंदर डान्स पाहिल्याने सुद्धा आनंद मिळतो. या चिमुकल्यांचा डान्स व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाल. तुमच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य येईल.

हेही वाचा : VIDEO : जेव्हा व्हॅलेंटाईन डेला तुमच्याजवळ गर्लफ्रेंड नसते…. तरुणाचा मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल

व्हायरल व्हिडीओ

हा व्हायरल व्हिडीओ एका डान्स क्लासमधील आहे. या व्हिडीओत काही चिमुकल्या मुली डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे सर्व मुलींनी एकसारखाच पोशाख परिधान केला आहे आणि त्या खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचे लक्ष एका चिमुकलीवर जाईल. तिच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तु्म्हीही थक्क व्हाल आणि तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य येईल. इतक्या कमी वयात ही चिमुकली डान्स करताना ज्या प्रकारे चेहऱ्यावर हावभाव दाखवते आहे, ते पाहून तुम्हीही म्हणाल की ही चिमुकली भविष्यात खूप मोठी डान्सर होईल.

aminas_karavane या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ओह माय गॉड! हे पाहून माझे हृदय भरून आले. उईघूरच्या भावी डान्स क्वीन त्यांच्या मार्गावर आहे. ताजिक लोकनृत्याचा सराव करणाऱ्या चिमुकल्या सुंदर मुली”
व्हिडीओच्या कॅप्शनवरून तुम्हाला कळेल की हे ताजिकिस्तानचे ताजिक लोक नृत्य आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आजपर्यंतचा सर्वात सुंदर व्हिडिओ” तर एका युजरने लिहिलेय, “किती गोंडस मुली आहेत” आणखी एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून बालपण आठवले” अनेक लोकांनी व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.