Accident Viral Video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक चिपळूणमधला लाइव्ह अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे.हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील.

हा भीषण अपघात चिपळूणमध्ये झाला आहे. रिक्षा आणि दुचाकी यांच्यात हा भयानक अपघात झाला. दुचाकीस्वार दोघे मागून भरधाव येऊन त्यांनी ऑटोला धडक दिली. या व्हिडीओमध्ये पाहू शकता,रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. सर्वसामान्यपणे वर्दळ होती. या दरम्यान रिक्षा समोरच्या दिशेतून येत होती. पण रिक्षा चालकाने मागेपुढे फार गाड्या नसल्याने यु टर्न मारला. नेमकं त्याचवेळी भरधाव वेगात दुचाकी आली. ही दुचाकी जोरात रिक्षाला धडकली आणि दुचाकीवरील दोघेजण खाली पडले. अतिशय थरारक असा हा अपघात झाला.

हा अपघात इतका भीषण होता की रिक्षा थेट विरुद्ध दिशेला फिरली. अपघाताच्या घटनेनंतर तातडीने परिसरातील नागरिकांनी जखमींना रुग्णालयात नेले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. या अपघाताची थरारक दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अतिशय अचूकपणे कैद झाले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! वाघ आणि अस्वलाचा झाला आमना-सामना, पुढे जे झालं त्यावर विश्वास बसणार नाही

सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. @kokanigram नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं कमेंट केली आहे की, चारही बाजूला लक्ष दिलं पाहिजे. तर दुसऱ्या युजरने कमेंटमध्ये केलीय की, “यामध्ये यांच्या चुकांमुळे इतर लोकांचे निष्पाप बळी जातात”