Live accident video: सर्वत्र अपघाताचं सत्र सुरु आहे. अशातच हे अपघात घडण्याला कारण वाहनचालकांचा बेशिस्तपणा आहे, हे अधोरेखित करणारी घटना समोर आली आहे. रात्रीच्या वेळी सिग्नल बंद असतात आणि सुरु असले तरी रात्रीच्या वेळी सिग्नल पाळणारे वाहन चालक मुंबईत क्वचितच आढळतील. अशावेळी चौकात वाहनं जर वेगानं हाकली, तर काय भयंकर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं, हे अधोरेखित करणारी घटना समोर आली आहे. या अपघाताने दुचाकीस्वारांचा बेशिस्तपणा आणि अतिउत्साह जीववार बेतू शकतो, हे ठळकपणे अधोरेखित केलंय. या अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून काळजाचा थरकाप उडवणाऱ्या व्हिडीओमध्ये रस्ते अपघातांची दाहकता अधोरेखित केलीय.

मध्यरात्रीच्या वेगानं क्षणात होत्याचं नव्हतं झालं

सोशल मीडियावर अपघाताचे व्हिड़ीओ नेहमी समोर येत असतात. भारतात आणि परदेशात अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. अशातच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे.

गाडी पुलावर अन् प्रवासी खाली कोसळले

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मध्यरात्रीची वेळ आहे, रस्त्यावर एकही वाहन किंवा व्यक्ती दिसत नाहीये. यावेळी एका पुलावर भरधाव वेगात एक दुचाकी येते आणि पुलाच्या वळणावर जोरदार धडकते. एवढंच नाहीतर या दुचाकीवर असणारे दोघेजण या पुलावरुन थेट खाली फेकले जातात. या गाडीचा वेग इतका होता की वळणावर वळणही गाडीला घेता आलं नाही आणि गाडी पुलाच्या कडेला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, यावर असलेले दोघेजण पुलावरुन थेट खाली पडले. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, कशाप्रकारे हे दोघेजण पुलावरुन खाली पडले, त्यानंतर त्यांना उठायलाही येत नव्हतं.

ही घटना नेमकी कुठे घडली याबद्दलची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर @Prateek34381357 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे! रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाडी थांबताच अवघ्या ३ सेकंदात मोबाईल लंपास; प्रवाशांनो खिडकीजवळचा ‘हा’ VIDEO एकदा पाहाच

या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं कमेंट केली आहे की, “अति घाई संकटात नेई.” तर दुसऱ्या युजरने कमेंटमध्ये केलीय की, “यामध्ये यांच्या चुकांमुळे इतर लोकांचे निष्पाप बळी जातात”