भारतीय संस्कृतीमध्ये कुंकू लावण्याला फार महत्त्व आहे. उत्तर भारतात लग्नाच्यावेळी भांगेत कुंकू भरण्याची पद्धत आहे. तर दक्षिण भारतात विविहित स्त्रिया कपाळावर कुंकू लावतात. कुंकू कपाळा किंवा भांगेत लावण्याला सौभाग्यचे लक्षण मानले जाते. पुरुष देखील कुंकू टिळा किंवा नाम म्हणून कपाळावर लावतात. कपाळाच्या मध्यभागी कुंकू लावण्यामागे शास्त्रीय कारण देखील सांगितले जाते. दरम्यान कुंकू कसे तयार केले जाते हे अनेकांना माहित नसते. कुंकू हे मुळत: हळदीपासून तयार केले जाते. पण आता बाजरात केमिकलयुक्त कुंकू विकले जात असल्याने अनेकांना असे भेसळयुक्त कुंकू लावल्याने त्रास होतो. दरम्यान सोशल मीडियावर एका आजीबाईंचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. घरच्या घरी केमिकलमुक्त कुंकू कसे तयार करायचे याची ट्रिक सांगितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजीबाईंनी घरच्या घरी कुंकू कसे तयार करावे?
व्हिडीओनुसार, सर्वप्रथम एका ताटलीमध्ये अर्धी वाटी हलद घ्या. त्यात एक चमचा खाण्याचा सोडा टाका. त्यात एक लिंबू पिळून मिश्रण एकत्र करून घ्या. एक चमचा तूप टाका. भुरशी येऊ नये म्हणून त्यात कापूर टाकला आहे. सुंगधासाठी त्यात गुलाब जल टाका. मिश्रणाला थोड्यावेळाने लाल रंग येईल. घरच्या घरी तयार केलेले नैसर्गिक कुंकू तयार आहे. हे कुंकू उन्हात चांगले वाळवून घ्या आणि हवा बंद काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा.

aapli_aaji नावाच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. . हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ आतापर्यंत ३ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे आणि हजारो लोकांनी व्हिडीओ पसंतीही दर्शवली आहे. Suman Dhamane असे आजीबाईंचे नाव आहे. आजीबाईंनी त्यांच्या गावरान शैलीमध्ये विविध पदार्थ तयार करण्याची प्रक्रिया सांगितात आणि करूनही दाखवतात. आजीबाईंच्या साधेपणाने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.

हेही वाचा – तुम्ही ‘महाराष्ट्रीयन’ आहात की, ‘महाराष्ट्रीय? मराठी भाषेतील रोजच्या रोज चुकणारे ‘हे’ शब्द तुम्ही वापरता का?

व्हिडीओनर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहे. अनेकांनी आजीचे कौतूक केले आणि नवनवीन गोष्टींबाबत माहिती दिल्याबद्दल आभारही व्यक्ती केले. एकाने व्हिडीओवर कमेंट करताना लिहिले की, “आजी खुप छान आहे कुंकू. मला माहिती नव्हते कुंकू कशापासून बनवतात, पण आज माहिती झाले. आजी तुमचे व्हिडीओ खूप छान असतात.” दुसऱ्याने लिहिले, “खूपच सुंदर कुंकू बनवलं आजी”

हेही वाचा – जेव्हा आनंद महिंद्रांना स्वत:चे काम ‘Challenging’ वाटते तेव्हा काय करतात? व्हिडीओ शेअर करत केला खुलासा

कुंकू कपाळावर लावण्याचे शास्त्रीय कारण काय?
योगशास्त्रानुसार, “कुंकू लावण्याच्या प्रक्रियेत कपाळावर भुवयांच्या मध्यभागी असलेल्या भ्रूमध्य आणि आज्ञाचक्रांवर दाब दिला जातो. यामुळे चेहऱ्यावरील स्नायूंना रक्त प्रवाह मिळण्यास मदत होते. मानवी शरीरात सात मुख्य चक्रे असतात, ज्यामध्ये मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञाचक्र, सहस्त्रार चक्र यांचा समावेश होतो. आज्ञाचक्राची देवता ‘आत्मा’ ही आहे व हे चक्र आपल्या डोळ्यांशी संबंधित आहे. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी या चक्रावर पडणारा दाब महत्त्वाचा मानला जातो.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make kumkum from turmeric at home old lady share recipe watch viral video snk
Show comments