Viral Video : “प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं.. तुमचं आमचं सेम असतं” प्रेम ही एक खूप सुंदर भावना आहे. जेव्हा माणूस प्रेमात पडतो तेव्हा तो एका वेगळ्याच विश्वात जगतो. तुम्ही प्रेमात पडलेली माणसं पाहिली असेल आणि प्रेमासाठी वाट्टेत ते करणारे अनेक प्रेमवेडे तुम्ही पाहिले असेल. तुमच्या आजुबाजूला असे अनेक लोकं असतील जे प्रेमात पडलेली आहे पण अशा प्रेमवेड्याला तुम्ही पाहिले नसेल. आज आपण प्रेमात पडलेल्या अशा तरुणाविषयी जाणून घेणार आहोत ज्याने प्रेमासाठी जे काही केले ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की या तरुणाने प्रेमासाठी चक्क त्याच्या ओठांच्या आत गर्लफ्रेंडच्या नावाचा टॅटू बनवला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये सुरुवातीला तुम्हाला दिसेल की टॅटू आर्टिस्टनी एका माणसाने कागदावर ‘अमृता’ नाव लिहिलेय आणि अमृता नाव लिहिलेला कागद तो एका तरुणाच्या ओठांच्या आत ठेवतो. सुरुवातीला तुम्हाला काहीही कळणार नाही पण नंतर व्हिडीओ पाहाल तर कागदावर लिहिलेले नाव हा टॅटू आर्टिस्ट या तरुणाच्या ओठांच्या आत कोरतो. कागदावरील नाव आणि टॅटू हुबेहूब दिसतो. या तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडच्या नावाचा टॅटू बनवला आहे. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. प्रेमासाठी लोकं काहीही करतात, असे तुम्हाला वाटू शकते.

हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्र आमच्या डोक्यावर आहे! भगव्या झेंड्याच्या सावलीत झोपलेल्या कुत्र्याचा Video Viral

tattoo_abhishek_sapkal_4949_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “प्रेम” या व्हिडीओवर हजारो लाईक्स आणि प्रतिक्रिया आलेल्या आहेत. अनेक युजर्सनी प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिलेय, “हा मूर्खपणा आहे” तर एका युजरने लिहिलेय, “प्रेम आंधळ असतं” आणखी एका युजरने लिहिलेय, “इस प्यार को क्या नाम दू” एक युजर लिहितो, “हेच पाहायचं बाकी होतं”