Premium

बंगळुरूच्या ट्रॅफिकमध्ये अडकल्याने व्यक्तीची चुकली ट्रेन, फिल्मी स्टाइलमध्ये रिक्षावाल्याने केली मदत; पाहा Viral Video

बंगळुरू सिटी जंक्शनमध्ये(Bengaluru City Junction) आपली ट्रेन सुटण्यानंतर हा एक रिक्षा चालक भेटला आणि ज्याने अवघ्या २०-२५ मिनिटांमध्ये १७ किलोमीटर दूर पुढच्या स्टेंशनवर येलहंका जंक्शनपर्यंत पोहचवले आहे.

Man misses train cause stuck in Bangalore traffic helped by rickshaw driver in filmy style Watch Viral Video
बंगळुरूच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या व्यक्तीची ट्रेन सुटते आणि त्याच्या मदतीला एक रिक्षावाला धावून येतो. (फोटो सौजन्य – एक्स, @Adil_Husain_)

तुम्ही ‘जब वी मेट’ चित्रपटामध्ये पाहिले असेल की, आदित्य (शाहिद कपूर) आणि गीतची (करीना) ट्रेन सुटते आणि एक टॅक्सी चालक त्यांच्या मदतीला येतो. आदित्य स्वत: तुफान वेगात कार चालवतो आणि पुढच्या स्टेशनची ट्रेन ऐनवेळी कोणीतरी त्यांच्या मदतीला धावून येते आणि भरधाव वेगाने गाडी धावत सुटते आणि ट्रेनच्या आधी स्टेशनवर पोहचते. पण हे सर्व चित्रपटातच नाही तर खऱ्या आयुष्यातही घडू शकते. होय, तुम्हाला विश्वास बसणार नाही पण असेच काहीसे एका व्यक्तीबरोबरही घडले आहे. बंगळुरूच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या व्यक्तीची ट्रेन सुटते आणि त्याच्या मदतीला एक रिक्षावाला धावून येतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक्स(ट्विटर)वर आदील हुसैन( @Adil_Husain) नावाच्या अकाउंटवर हा किस्सा सांगितला आहे. आदिल आणि त्याच्या मित्राच्या मदतीला एक रिक्षावाला अगदी फ्लिमी स्टाईलमध्ये मदतीला धावून आला. बंगळुरू सिटी जंक्शनमध्ये(Bengaluru City Junction) आपली ट्रेन सुटण्यानंतर हा एक रिक्षा चालक भेटला आणि ज्याने अवघ्या २०-२५ मिनिटांमध्ये १७ किलोमीटर दूर पुढच्या स्टेंशनवर येलहंका जंक्शनपर्यंत पोहचवले आहे.

हेही वाचा – “माणुसकी अजूनही जिवंत आहे!” चेन्नईत पूराच्या पाण्यात अडकलेल्या कुत्र्यांचा व्यक्तीने वाचवला जीव; लोकांनी केले कौतूक

रिक्षावाल्यााने जेव्हा त्याला ही मदत ऑफर केली आणि तेव्हा आदील थोडा द्विधा मनस्थितीमध्ये होता. तो विमानाने प्रवास करण्याचा विचार करत होतो पण ते फार खर्चिक होते. रिक्षाचालकाला मात्र स्वत:वर विश्वास होता, तो आदिल आणि त्याच्या मित्राला दिलासा देत होतो की, “पुढच्या स्टेशनवरून त्यांची ट्रेन सुटणार नाही.” विमान प्रवासावर पैसे खर्च करण्याऐवजी आदिलने रिक्षाचालकाची मदत स्विकारली आणि ट्रेन चुकणार नाहीया आशेने तो त्याच्या मित्रासोबत रिक्षामध्ये बसला. त्यांच्या आश्चर्याची गोष्ट म्हणजे, रिक्षाचालकाने हे करूनही दाखवले अवघे ५ मिनिटे बाकी असताना त्यांने दोघांना पुढच्या स्टेशनवर पोहचवले. भरधाव स्पीडने फक्त २५ मिनिटांमध्ये त्याने वेळेत स्टेशनवर पोहचवले आणि तेही फक्त २५०० रुपयांमध्ये. विमान किंवा इतर गाड्यांसारखे पर्यायी वाहतूक पर्याय निवडण्यापेक्षा खूपच स्वस्त आहे असे आदिलला वाटले.


हेही वाचा – काश्मीरच्या विकासावर तरुणांनी गायले रॅप साँग; तुम्ही ऐकले का ‘बदलता काश्मीर’ गाणे? पाहा व्हायरल व्हिडीओ

आदिलने एक्सवर त्याचा अनुभव शेअर केला आणि SBC स्टेशनवरून प्रशांती एक्सप्रेस पकडण्यासाठी तो कसा धावत होता. वाहतूक कोंडीत अडकल्याने त्याला उशीर झाला पण रिक्षाचालकाच्या आत्मविश्वासामुळे पुढचे स्टेशन येलाहंका जंक्शनवर ट्रेन पकडता आली. रिक्षाचालकाने विलक्षण वेगात आणि व्यवस्थित कोंडीतून मार्ग काढत त्याला वेळेवर स्टेशनवर पोहचवले.

हेही वाचा – ‘डिजिटल जप माळ’ पाहून थक्क झाले हर्ष गोएंका, म्हणाला, “हा आहे आपला देश!” पाहा Viral Video

अखेर रिक्षाचालकाच्या दृढनिश्चयी प्रयत्नांमुळे आदिल आणि त्याचा मित्र त्यांची ट्रेन येण्याच्या पाच मिनिटे आधी, दुपारी २:१५ वाजता आरामात येलाहंका जंक्शनवर पोहोचले. आदिलने दररोज कमाई करण्याच्या या पद्धतीमुळे रिक्षाचालक ७५,००० रुपयांची कमाई कसा करत असेल याच अंदाजही व्यक्त केला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man misses train cause stuck in bangalore traffic helped by rickshaw driver in filmy style watch viral video snk

First published on: 07-12-2023 at 17:09 IST
Next Story
महिलेनं केलं धाडस! हेलिकॉप्टर हवेत असताना मारली उडी; थरारक VIDEO झाला व्हायरल