अमेरिकन अंतराळ संस्था नासाने (NASA) चंद्राभोवती फिरत असलेल्या रहस्यमय सिल्व्हर सर्फबोर्डच्या (mysterious silver surfboard) आकाराच्या वस्तूचे फोटो शेअर केले आहेत. NASA च्या Lunar Reconnaissance Orbiter (LRO) ने हे फोटो काढले आहे. ती मार्व्हलच्या ‘सिल्व्हर सर्फर’ बोर्डसारखे दिसणारी वस्तू नक्की काय आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे. सोशल मीडियावर या रहस्यमयी फोटोची चर्चा सुरू आहे. काहींनी काल्पनिक पात्र सिल्व्हर सर्फरच्या सर्फबोर्डशी या वस्तूची तुलना देखील केली.

NASA चे Lunar Reconnaissance Orbiter (LRO) हे एक अंतराळयान १५ वर्षे चंद्राभोवती फिरत आहे आणि त्याचा अभ्यास करत आहे, त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये चंद्राभोवती फिरणारी “सर्फबोर्ड-आकाराची” वस्तू दिसत आहे. पण या रहस्यमय वस्तूचा कॉमिक बुकच्या जगातील किंवा सुपरहिरो चित्रपटांशी किंवा अगदी अज्ञात फ्लाइंग ऑब्जेक्टशी (यूएफओ) काहीही संबंध नाही.नासाच्या म्हणण्यानुसार, हे कोरिया एरोस्पेस रिसर्च इन्स्टिट्यूटचे Danuri हे चंद्रभोवती फिरणारे अंतराळयान आहे. LRO अंतराळयानाने त्याच्या उलट दिशेने प्रवास करताना Danuriचा फोटो काढला आहे. Danuri हे चंद्रावर पाठवलेले दक्षिण कोरियाचे पहिले अंतराळ यान आहे म्हणजे डिसेंबर २०२२ पासून चंद्राच्या कक्षेमध्ये फिरते आहे.

नासाच्या प्रेस नोटनुसार, “LRO ने कोरिया एरोस्पेस रिच इन्स्टिट्यूटद्वारे पाठवलेल्या Danuriचे काही फोटो काढले आहेत. जेव्हा दोन्ही अंतराळयान ५ ते ६ मार्च दरम्यान समांतर रेषेत परंतु विरुद्ध दिशांनी प्रवास करत होते तेव्हा हे फोटो काढण्यात आले आहेत.

अंतराळ संस्थेने सांगितले की, “२०२२ पासून चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत असलेल्या Danuriचे फोटो काढताना LRO खूप वेगात बाजूने गेल्यामुळे ते सिल्व्हर सर्फबोर्ड सारखे दिसत आहे.”

NASA ने लिहिले, “जरी LRO च्या कॅमेरा एक्सपोजरची वेळ (फक्त ०३३८ मिलीसेकंद)खूपच कमी होती पण दोन अंतराळ यानांमधील तुलनेने जास्त प्रवास गतीमुळे Danuri प्रवासाच्या विरुद्ध दिशेने त्याच्या आकाराच्या १० पट असल्याचे दिसत होते.”

हेही वाचा – सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo

अंतराळ संस्थेने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की,”मेरिलँडच्या ग्रीनबेल्टमध्ये गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटरमध्ये LRO संचालन टीमला Danuriची एक झलक मिळवण्यासाठी LORCला योग्य वेळी, योग्य ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक होते. पण दोन्ही अंतराळायानाच्या दरम्यान खूप जास्त वेग होता जो साधारण ११,५०० किमी प्रतितास इतका होता ज्यामुळे हे काम सोपे नव्हते.”

हेही वाचा – रोबोट आहे की तरुणी? चीनी रेस्टॉरंटमधील वेट्रेसची एकच चर्चा, Video पाहून सांगा, तुम्हाला काय वाटते?

नासाने सांगिकले की, “LROने नॅरो अँगल कमेऱ्यामध्ये तीन कक्षांच्या दरम्यानचे फोटो काढले आहे, हे फोटो काढणासाठी Danuriच्या फार जवळ जावे लागले. LRO २००९मध्ये लॉन्च करण्यात आले होते. तेव्हापासून आपल्या सात शक्तिशाली उपकारणांसह महत्त्वपूर्ण माहिती गोळा करत आहे. हे चंद्राचा अभ्यासामध्ये एक अमुल्य योगदान मानले जाते.