Optical Illusion Image: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो व्हायरल होत असतात. लोकांना हे ऑप्टिकल इल्यूजन फोटो खूप आवडतात. कारण, ते लोकांना कन्फ्यूज करतात. आपल्याला एखाद्या फोटोत काही दिसत असते मात्र, थोडा वेळ प्रयत्न केल्यावर समजते की सत्य काही वेगळंच आहे. कदाचित त्यामुळेच सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन असलेले फोटो धुमाकूळ घालत असतात. आज आम्ही असाच एक ऑप्टिकल इल्यूजनशी संबंधीत फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जो तुम्हाला चक्रावून सोडेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वास्तविक, व्हायरल होत असलेला हा फोटो जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला फक्त माणसांची गर्दी दिसेल, पण या लोकांच्या गर्दीमध्ये एक प्राणीही लपून बसलेला आहे. हा प्राणी तुम्हाला शोधून काढायचा आहे. तुमच्याकडे फक्त नऊ सेकंद आहेत. पण या लोकांच्या गर्दीमध्ये प्राणी शोधणे हे सोपे नाही. कारण तो प्राणी चतुराईनं बसला आहे. त्यासाठी तुम्हाला चित्र बारकाईने पाहावे लागेल. तेव्हाच तुम्हाला चित्रात लपलेला प्राणी दिसेल. तुम्ही जर हुशार असाल आणि तुमची नजर तीक्ष्ण असेल तर तुम्हाला याचं उत्तर नक्कीच सापडेल.

(फोटो : social media)

(हे ही वाचा : Optical Illusion: फोटोतीwww.loksatta.com/trending/optical-illusion-photo-who-is-this-mans-real-wife-answer-within-20-seconds-looking-carefully-at-the-picture-pdb-95-3847899/ल ‘या’ तीन महिलांपैकी पुरुषाची कोण आहे खरी बायको? शोधून भल्याभल्यांनी टेकले हात )

चित्रात लपलेला प्राणी दिसला का?

या फोटोत लपलेला प्राणी तुम्हाला दिसला नाही का, या फोटोत तुम्हाला मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष दिसणार. पण या लोकांच्या गर्दीतून तुम्हाला प्राणी शोधायचा आहे. तुम्ही सतत फोटो पाहत राहिल्यास हा भ्रम दूर करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल. जर तुम्ही नीट बघितले तर तुम्हाला त्यात पांडा दिसेल. तरीही तुम्हाला प्राणी सापडला नसेल तर खालील फोटोमध्ये योग्य उत्तर तुम्ही पाहू शकता.

हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा ऑप्टिकल भ्रम सोडवण्यात बरेच लोक अयशस्वी झाले. तुम्हाला पांडा सापडला का? तुम्हाला सापडला नाही तर आम्ही तुम्हाला उत्तर देत आहोत. तुम्हाला चित्राच्या मध्यभागी पांडा दिसेल. काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा हा पांडा माणसांच्या गर्दीत लपून बसलेला आहे.

पाहा या फोटोत लपलेला पांडा

(फोटो : social media)
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Optical illusion photo find the panda among the humans in 9 seconds looking carefully at the picture pdb
First published on: 05-10-2023 at 13:00 IST