Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके भयानक असतात की पाहून अंगावर काटा येतो. काही व्हिडीओ इतर देशातील असतात. इतर देशातील व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. पाकिस्तानचे अनेक व्हिडीओ समोर येतात. पाकिस्तानच्या व्हिडीओवर अनेकदा भारतीय लोकं सुद्धा प्रतिक्रिया देतात.

सध्या असाच एक पाकिस्तानचा धक्कादायक व्हिडीओ चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईन. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की पाकिस्तानची लोकप्रिय गायिका शाजिया मंजूर यांनी एका लाइव्ह शोमध्ये होस्टच्या सनसनीत कानात लगावली. अचानक लाइव्ह शोमध्ये घडलेला प्रकार पाहून अनेकांनी हा व्हिडीओ स्क्रिप्टेड असल्याची शंका व्यक्त केली. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Mumbai Women Buys 19 Flats Worth 118 Crores In Malbar Hill
“बंगल्यासमोर बिल्डिंग बांधली, समुद्र कसा बघू?”, म्हणत दक्षिण मुंबईत १९ फ्लॅट्स विकत घेणारी ‘ती’ आहे तरी कोण?
priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”
devendra fadnavis and manoj jarange patil (1)
मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट, “देवेंद्र फडणवीसांनी पहाटे तीन वाजता फोन केला आणि..”
Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap and prajakta mali video viral
Video: पृथ्वीक प्रतापने शेअर केला प्राजक्ता माळीबरोबर ऑस्ट्रेलियातून व्हिडीओ, नेटकरी म्हणाले, “मग कर्जतचं फार्म हाऊस…”

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की गायिका शाजिया मंजूर या लाईव्ह शोमध्ये अचानक होस्ट यांच्यावर भडकतात आणि त्याला थापड मारतात त्यानंतर जागेवरून उठतात. पुढे शाजिया म्हणतात, “मागच्या वेळी सुद्धा तुम्ही असे वागला होता आणि मी त्यावेळी तुमचे वागणे मस्करीत घेतले होते पण यावेळी मी सिरीअस आहे. तुम्ही महिलांबरोबर असेच बोलता का? तुम्ही हनीमून म्हणत आहात” हा सर्व प्रकार घडत असताना पडद्यामागे काम करणारे कर्मचारी धावत स्टेजवर येताना दिसतात आणि परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला पण शाजिया या रागाच्या भरात स्टूडीओच्या बाहेर जातात.

हेही वाचा : घरच्या घरी बनवा हळदीपासून कुंकू! आजीबाईंनी संगितली ट्रिक, पाहा Viral Video

Ghar Ke Kalesh या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “स्क्रिप्टेड आहे का?” तर एका युजरने लिहिलेय, “स्क्रिप्टेड असेल.” सोशल मीडियावर या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे.

कोण आहे शाजिया मंजूर?

शाजिया मंजूर या एक लोकप्रिय पाकिस्तानी गायिका आहे. त्या खूप जास्त पंजाबी गीत गातात. त्यांनी विविध प्रकारचे पंजाबी लोकगीत आणि पंजाबी सूफी कविता सुद्धा गायल्या आहेत. त्या कधी कधी उर्दू गाणी गातात.