रस्त्यावर वाहन चालविताना काळजी घेणे गरजेचे असते. त्यासाठी सरकारने काही नियम ठरवून दिले आहेत. कारण- हे नियम तुमच्या आणि आमच्या सुरक्षिततेसाठी बनविलेले असतात. जर आपण हे नियम पाळले नाहीत, तर त्यामुळे स्वत:सह इतरांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यात एक जोडपे वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत अतिशय धोकादायक पद्धतीने गाडी चालविताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक जोडपे स्कूटीवरून कुठेतरी जाताना दिसत आहे. मात्र, यादरम्यान त्यांनी असे कृत्य केले; ज्यामुळे त्यांच्या मुलाचा जीव धोक्यात आला. या जोडप्याने मुलाला सीटवर बसविण्याऐवजी त्याला फूटरेस्टवर उभे केले आहे. जोडप्याच्या निष्काळजीपणामुळे त्या मुलाचा तोल बिघडला असता किंवा फूटरेस्ट वजनाने तुटले असते, तर अपघात होण्याची शक्यता होती. त्यामुळे मुलाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता, तरीही कसलाही विचार न करता पालक भररस्त्यात चालत्या स्कूटीवरून मुलाला या पद्धतीने घेऊन जाताना दिसत आहेत.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हा व्हायरल व्हिडीओ @Gulzar_sahab नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय की, कोणतेही पालक आपल्या मुलाशी असे कसे करू शकतात? अतिशय लाजिरवाणा व्हिडीओ. त्यावर एका युजरने कमेंट करीत लिहिले – बेफिकीरपणालाही मर्यादा असते. दुसऱ्या एका युजरने लिहिलेय की, खरंच, लोक वेडे होत आहेत, त्यांना रील्ससाठी मुलाच्या जीवाचीही पर्वा नाही. तिसऱ्या एका युजरने लिहिलेय की, हे शक्य आहे की मूल हे करण्याचा आग्रह करत असेल.