भारतात पसरलेले रेल्वेजाळे खूप चांगले आहे. पण लोकसंख्येच्या तुलनेत रेल्वे गाड्याची संख्या मात्र खूप कमी आहे. परिणामी प्रवासांना गर्दीने खचाखच भरलेल्या रेल्वेमधून प्रवास करावा लागतो. सध्या अशाच एका गर्दीने खचाखच भरलेल्या रेल्वेच्या डब्यातील स्थिती दर्शवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे,

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काशी एक्स्प्रेसच्या द्वितीय श्रेणीच्या एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला एक भयानक अनुभव आला आहे . या व्यक्तीने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) वर एक व्हिडिओ शेअर केला आणि भारतीय रेल्वेला कारवाई करण्याची विनंती केली. अदनान बिन सुफियान यांनी पोस्ट केलेल्या२४ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये रेल्वेच्या एका डब्यामध्ये खाली बसलेल्या प्रवाशांनी खचाखच भरल्याची भीषण स्थिती दिसत आहे.

“सर्वात वाईट म्हणजे एसी काम करत नसल्याने रेल्वेच्या डब्याचे दरवाजे उघडे होते.” असा आरोप अदनानने केला. खरं तर, लोक शौचालयाजवळ उभे असलेले दिसले आणि जागेअभावी कॉरिडॉर ब्लॉक झाला आहे असे दिसते.

अदनानने आपल्या पोस्टमध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग केले आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचे आवाहन केले.
@AshwiniVaishnaw सर, कृपया एसी 2-टायर कोचची स्थिती पहा. अन्न नाही, पाणी नाही. वॉशरूममध्ये जाण्यासाठी रस्ता नाही. एसी काम करत नाही. दरवाजे उघडे आहेत. कृपया कारवाई करा. #KashiExpress,” असे कॅप्शन त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे.

हेही वाचा – तुम्ही खाऊ शकता का हा निळ्या रंगाचा भात? Viral Video पाहून चक्रावले नेटकरी

येथे व्हिडिओ पहा:

अदनानने ट्रेनमधील आणखी एक फोटो शेअर केला आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी अधिकृत एक्स खाते असलेल्या रेल्वे सेवाने विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भुसावळ या खात्याला टॅग केले आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडिया यूजर्सनीही असेच अनुभव शेअर केले.

“आणि हे पहिल्यांदाच घडत आहे असे नाही. मला सुद्धा एक त्रासदायक अनुभव आला जिथे जागा निश्चित असूनही माझे संपूर्ण कुटुंबाने मुंबई ते वडोदरापर्यंत सहा तास उभे राहून प्रवास केला. , असे” एका वापरकर्त्याने एक्स वापरकर्त्या कपिलच्या पोस्टवर टिप्पणी केली, ज्याने अदनानचा व्हिडिओ देखील शेअर केला.

उत्तर रेल्वेच्या अधिकृत खात्याने देखील या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि रेल्वे संरक्षण दलाला “या प्रकरणात लक्ष घालण्याचे” निर्देश दिले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passenger shares video of kashi expresss overcrowded coach no ac food or water snk