झोमॅटो डिलिव्हरी बॉय नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. सध्या अशाच एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयची चर्चा सुरू आहे. दरम्यान सोशल मीडियावर एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा फोटो व्हायरल झाला आहे. झोमॅटो डिलिव्हरी बॉयची बाईक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. एवढंच नव्हे तर झोमॅटोचे सीईओ दिपेंद्र गोयल यांनी सुद्धा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये नक्की असे काय आहे ज्यामुळे हा फोटो सध्या चर्चेत आला आहे. चला सविस्तर जाणून घेऊ या.

झोमॅटोचे डिलिव्हरी बॉय सहसा दोन चांकाची बाईक वापरताना दिसतात पण व्हायरल फोटोमधील व्यक्तीच्या बाईकला तीन चाक आहेत कारण हा व्यक्ती दिव्यांग असून तो व्हिलचेअर बाईक चालवत आहे. व्हिलचेअर बाईक वापरून हा दिव्यांग व्यक्ती फुड डिलिव्हरी करत आहे. झोमॅटोचा या डिलिव्हरी बॉयची मेहनत करण्यासाठीची जिद्द पाहून नेटकऱ्यांना त्याचे कौतुक वाटत आहे. व्हिलचेअर बाईक बसून हसणाऱ्या दिव्यांग डिलिव्हरी बॉयने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.

फोटोबरोबर, कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “प्रिय @zomato आणि @deepigoyal, तुमच्या कंपनींमध्ये बऱ्याच काळाने पाहिलेली सर्वात चांगली गोष्ट आहे, जिथे बेशिस्त वाहनचालक ज्यांनी रस्त्यावर प्रवास करणे अवघड केले आहे , तिथे हे दृश्य पाहणे अत्यंत खास क्षण आहे. त्याची कथा प्रेरणादायी आहे. शब्बाश!

व्हीलचेअर बाईक नियोमोशन (NeoMotion) नावाच्या कंपनीने तयार केले.

पोस्ट केले गेल्यानंतर, हा फोटो एक्स वर १७ हजार पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आणि नेटकऱ्यांकडून कित्येक प्रतिक्रिया मिळाल्या. गेल्या वर्षी, श्री गोयल यांनी घोषणा केली होती की झोमॅटोसह नियोमोशन केटो बरोबर भागिदारी करणार आहेत. “

गोयल यांनी एक्सवर लिहिले आहे, “त्यांनी प्रत्येक डिलिव्हरी वाहन डिलिव्हरी बॉयच्या गरजेनुसार बनवले आहे. हे एंजटसाठी जास्तीत जास्त आरामदायी आणि गती देण्याच मदत करते. तसेच ही वाहन इलेक्ट्रिक आहे ज्यामुळे पर्यावरणासाठी अनुकूल आहे.