Viral video: ‘श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी’ बाप-लेकीचं नात वेगळं सांगायची गरज नाही. जगातील कुठल्यातं नात्यात जेवढी ओढ नसते तेवढी ओढ बाप-लेकीत असते. बाबा हा आपल्या मुलीसाठी काहीही करू शकतो. तो एकाच नात्यात हजारो नाती लेकीसाठी निभावत असतो. आयुष्यात कितीही मोठ्या संकटाची लाट येऊ देत; बाबा हा किनाऱ्यासारखा भक्कम उभा असतो. आणि याच वडिलांच्या नजरेत जेव्हा एक मुलगी जिंकते ना तेव्हा ती जग जिंकलेली असते. शेवटी बापाएवढं लेकीचं कौतुक कुणालाच नसंत मात्र आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केल्यानंतर बघायला तेच नसतील तर? कल्पनाही करवत नाही ना.. पण एका मुलीसोबतच असंच काहीसं घडलंय. ती अधिकारी तर झाली मात्र तीचं हे यश बघण्यासाठी तिचे बाबा या जगात नाहीत. यावेळी माय-लेकीचा एका भावनिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

एका मुलीच्या आयुष्यात तिच्या वडिलांचं स्थान काय असतं हे वेगळं सांगायची गरज नाही. वडिल म्हणजे तिच्यासाठी देवमाणूसच असतो. हेच वडिल जेव्हा सोडून जातात तेव्हा तिच्यावर आभाळ कोसळतं. मात्र या मुलीनं वडिल गेल्यानंतर वडिलांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण केलंय.

आई-वडिल आपल्या मुलांना मोठं करतना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. हेच कष्ट डोळ्यासमोर ठेऊन काही मुलं मात्र आई-वडिलांचं नाव मोठं करतात. सध्या असाच एक भावूक करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.एका मुलीनं मेहनतीच्या जोराजवर तिच्यासोबतच तिच्या वडिलांचंही स्वप्न पूर्ण केलं आहे. ती पोलीस अधिकारी झाली असून पहिल्यांदा ती गणवेशात आल्यानंतर तिला वडिलांची फार आठवण झाली, यावेळी तिनं वडिलांचा फोटो घेऊन अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. वडिल गेल्यानंतर आईनं कष्टानं तिला मोठं केलं तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बळ दिलं. आज या आईततच ती तिच्या वडिलांना बघत असल्याचं तिच्याकडे बघून जाणवतं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बस चालकाची हुशारी; सोनसाखळी चोराला असा पकडला, VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

हा व्हिडीओ सोशल मीडियावर dream_journey01 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत. तर नेटकरीही व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

नेटकरी मुलीचं या कृतीचे कौतुक करीत आहेत. “ही मुलगी खूप भाग्यवान आहे. कारण- तिला तुमच्यासारखे वडील मिळाले”, अशी प्रतिक्रिया एकानं दिली आहे. तर दुसऱ्या एक युजरनं “अशी मुलगी सर्वांना हवी”, अशी प्रतिक्रिया दिली आहे. वडील आणि मुलीचं नातं खूपच खास असतं. मुलं आईच्या खूप जवळची असतात, तर मुली वडिलांच्या खूप जवळच्या असतात, असं म्हटलं जातं.