Viral Video : पुणे हे महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय शहर असून सांस्कृतिक शहर, विद्येचे माहेरघर, ऐतिहासिक शहर, अशा अनेक नावाने हे शहर ओळखले जाते. येथील ऐतिहासिक वास्तू, मराठी संस्कृती, खाद्यसंस्कृती विशेष प्रसिद्ध आहे.पुणेरी पाट्यांपासून पुण्याची बाकरवडीपर्यंत येथील अनेक गोष्टी जगप्रसिद्ध आहे. दरवर्षी पुण्यात हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी येतात आणि येथेच स्थायिक होतात. बाहेरून येणाऱ्या लोकांना पुणे हे आपले वाटते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भेळ विकणाऱ्या वृद्ध प्रेमळ जोडप्याबरोबरचा एका तरुणाचा संवाद दाखवला आहे. या व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण भेळ विक्रेता आजी आजोबांकडे जातो. आजी आजोबांनी भर उन्हात भेळचा स्टॉल लावलेला दिसत आहे तरुण स्टॉलजवळ गेल्यावर म्हणतो, “आजोबा मला भूक लागली होती. थोडीशी भेळ हवी होती. मिळेल का? थोडीच हवीये. कितीला चाळीस रुपयांना आहे ना?” त्यावर आजोबा लगेच उठतात आणि भेळ बनवायला घेतात. तितक्यात आजी म्हणते, “असं म्हणायचं ना” त्यावर तरुण म्हणतो, “एवढ्या उन्हात तुम्ही कष्ट करतायेत त्याच्यामुळे”

त्यानंतर आजी त्याला सावलीत बसायला बोलावते. त्यानंतर तरुण सावलीत बसतो. तेव्हा तो आजोबांना विचारतो, “तुम्ही कसे काय या वयात कष्ट करतायत, रस्तावर इतक्या उन्हात थांबून” त्यावर आजोबा म्हणतात, “काय करतं बाळा काहीतरी करून पोट भरलं पाहिजे ना आता.” त्यावर तरुण म्हणतो, नवल आहे तुमच्याकडे बघून आम्हाला ताकद येते. त्यानंतर तरुण म्हणतो, ” थोडी टेस्ट करायला द्या हातात” त्यानंतर आजी लगेच म्हणते, ” खा ना भूक लागली म्हणतो..” त्यावर तरुण म्हणतो, “नंतर खाईन मला जायचं” शेवटी तरुण निघून जातो.

व्हिडीओ पाहून तु्म्हीही भावूक व्हाल. आजी आजोबांनी दाखवलेली माणूसकी तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “घड्याळ आमचे चोरुन नेले…” नवरदेवानं उखाण्यातून दिला शरद पवारांना पाठिंबा; भन्नाट VIDEO होतोय व्हायरल

prank_maza_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुण्यासारखी माणुसकी कुठे सापडेल?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ही जुनी माणसं खूप भारी आहेत. आपलं नशीब की आपण यांना पाहतोय, अनुभवतोय, पुढच्या पिढीला यांच्याबद्दल फक्त गोष्टीतूनच कळेल.” तर एका युजरने लिहिलेय, “माणुसकी फक्त कुठल्या तरी शहरातच नसते ती फक्त माणसात असते मग ती माणसं कुठेही राहोत” आणखी एका युजरने लिहिलेय, “माणुसकीच उत्तम उदाहरण असलेली ही शेवटची पिढी” एक युजर लिहितो, “पुण्यात माणुसकी आहे म्हणून तर प्रत्येकजण येथे पोट भरण्यासाठी येतो.”