विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून दहा दिवसांहून अधिक कालावधी लोटला असला तरी राज्यात अद्याप सत्ता स्थापन झालेली नाही. राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. असं असलं तरी ५०-५० सुत्रामुळे भाजपा आणि शिवसेनेमध्ये सत्ता स्थापनेचे तिढा सुटलेला नाही. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे ‘सामना’मधील अग्रलेखांबरोबरच पत्रकार परिषदांमधून भाजपावर टीका करताना दिसत आहेत.

एकीकडे भाजपाकडून कोणीही औपचारिकरित्या प्रतिक्रिया देत नसताना संजय राऊत रोज टीकाच्या फैरी झाडताना दिसत आहेत. त्यामुळेच आता संजय राऊत हे नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत. राऊत यांचे कौतुक करणारे, त्यांच्यावर टीका करणारे अनेक विनोद सोशल नेटवर्किंवर व्हायरल झाले आहे. पाहुयात असेच काही व्हायरल विनोद…

राऊत येणे…

आयुष्य चांगले सुरू होते…

चाणक्य…

असं सुरुय हे..?

कपल गोल्स…

एक राऊत…

जुना बदला

काही दिवसात

असे योगदान

तुम नाजूक सी जिद्दी लडकी…

खिडकी उघडली की पाऊस आणि बातम्या लावल्या की संजय राऊत

छोटा भाई शॉक..

आयुष्यात संकट फडणवीस बनून येतील…

एकच वाघ

योगदान

कोण कोणाचे काय

फॉग नाही राऊत चाललेत…

दरम्यान, ‘नागपूर तरुण भारत’ या वृत्तपत्रातील अग्रलेखामधून राऊत यांच्यावर पहिल्यांदाच टीका करण्यात आली आहे. विक्रम-वेताळ या पुराण कथेचा आधार घेत राऊत यांचे नाव न घेतला त्यांचा ‘बेताल’ असा उल्लेख करण्यात आला आहे. राऊत हेच राज्यामध्ये महायुतीचे सरकार आणण्यात अडथळा निर्माण कर असून संजयच धृतराष्ट्र होणार असेल तर शिवसेनेच्या भवितव्यासाठी चिंतन होणे आवश्यक असल्याची टीका या अग्रलेखामधून करण्यात आली आहे. महाराष्ट्र शिवसेनेला कधीच माफ करणार नाही अशी टीका या अग्रलेखातून शिवसेनेच्या भूमिकेचा समाचार घेताना करण्यात आली आहे. या टीकेविषयी मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये “‘तरुण भारत नागपूर’ नावाचा असा कोणते वृत्तपत्र आहे हे मला ठाऊक नाही,” असे उत्तर देत राऊत यांनी या भाष्य करणे टाळले.