Premium

बहीण ही नेहमी दुसरी आई असते! चिमुकल्या भावाबरोबर शाळेत जातानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

बहीण भावाचे नाते खूप आगळे वेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि एकमेकांविषयी आपुलकी असते. बहिण भाऊ कितीही भांडले तरी एकमेकांशिवाय राहू शकत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघे बहीण भाऊ शाळेत जाताना दिसत आहे.

sister is always a second mother
बहीण ही नेहमी दुसरी आई असते! चिमुकल्या भावाबरोबर शाळेत जातानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल (Photo : Instagram)

Viral Video : सोशल मीडियावर बहीण भावांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की पोट हसायला येतं तर काही व्हिडीओ इतके भावनिक असतात की डोळ्यांत पाणी येतं.
बहीण भावाचे नाते खूप आगळे वेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि एकमेकांविषयी आपुलकी असते. बहिण भाऊ कितीही भांडले तरी एकमेकांशिवाय राहू शकत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघे बहीण भाऊ शाळेत जाताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून काही जणांना त्यांच्या भावंडांची आठवण येऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये बहीण भाऊ रस्त्यानी जाताना दिसत आहे. त्यांनी शाळेचा गणवेश घातला आहे. बहिणीच्या हातात सायकल आहे आणि तिच्या बाजूला तिचा लहान भाऊ तिच्याबरोबर चालतोय. सायकल असून सुद्धा ती पायी जाताना दिसते आणि सुरक्षितपणे तिच्या भावाला बरोबर घेऊन जाताना दिसतेय. बहीण ही नेहमी दुसरी आई असते, असं म्हणतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या बहिणीबरोबरचे लहानपणीचे दिवसं आठवू शकतात.

हेही वाचा : Video : शरारा शरारा! काळ्या साडीत तरुणीने लावले वेड, डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल

motivated_humanz’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बहिणीचं प्रेम”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने लिहिलेय, “बहीण ही देवाने दिलेली सुंदर भेट आहे” तर एका युजरने लिहिलेय, “बहिण ही दुसरी आई नाही तर एक आई असते” काही युजर्स त्यांना बहीण नसल्याची खंत व्यक्त केली आहे. व्हिडीओ पाहून अनेक युजर्सनी त्यांच्या बहिणीला टॅग केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sister is always a second mother bother sister going to school video will make you remember your childhood days ndj

First published on: 04-12-2023 at 16:50 IST
Next Story
…अन् पठ्ठ्या वाघाशी भिडला; मात्र वाघ तो वाघच…नडला की तोडलाच, चकमकीचा VIDEO व्हायरल