पुरुषांनो सावधान… बायकोचा वाढदिवस विसणाऱ्या पतीला होणार तुरुंगवास; ‘या’ देशाने केलाय कायदा

जगात असा एक देश आहे जिथे आपल्या पत्नीचा वाढदिवस विसरणं हा कायद्याने गुन्हा आहे.

Forgetting Wifes Birthday Is Illegal
मात्र तरुंगवासाची शिक्षा सुनावण्यासाठी एक अट आहे. (प्रातिनिधिक फोटो)

समाजामध्ये राहणाऱ्या सर्व व्यक्तींना एकमेकांशी सलोख्याने आणि एकमेकांना सन्मान करुन रहावे या हेतूनेच समान नियम आणि कायदे तयार केले जातात. सामान्यपणे जगभरामध्ये गुन्हेगारी किंवा वाईट कृत्यांसाठी थोड्याफार फरकाने सारखेच कायदे असतात. तरी काही देशांमध्ये तेथील आर्थिक, सामाजिक परिस्थिती पाहून वेगळे आणि अगदी हटके कायदेही तयार केले जातात. आपल्या देशामधील गरजा आणि आवश्यक गरजा भरुन काढण्याच्या दृष्टीने काही देश कायदे करतात. मग या गरजा अगदी महसूल गोळा करण्यापासूनच्या आर्थिक बाबींपासून ते वारसा टिकवण्यासाठीची सामाजिक नियमावली असे काहीही असू शकतात.

आता याच आगळ्या वेगळ्या काद्याचं उदाहरण द्यायचं झाल्यास, जगात असा एक देश आहे जिथे आपल्या पत्नीचा वाढदिवस विसरणं हा कायद्याने गुन्हा आहे. या देशामध्ये पत्नीचा वाढदिवस विसरणाऱ्याला तुरुंगाची हवा खावी लागू शकते. पॅसिफिक महासागरामध्ये सामाओ नावाचा एक छोटा बेट वजा देश आहे. या देशात एखादा नवरा आपल्या पत्नीचा वाढदिवस विसरल्यास त्याला तुरुंगवासाची शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात आहे.

सामाओमधील कायद्यानुसार पत्नीचा वाढदिवस विसरणे हा गुन्हा आहे. पत्नीचा वाढदिवस विसणाऱ्यांना केवळ गुन्हा म्हणून सोडून दिलं जात नाही. तर पत्नीचा वाढदिवस विसरल्यावप्रकरणी थेट तुरुंगवासाची शिक्षाही सुनावण्यात येते. तसेच चौकशीही केली जाते. यासाठी अट केवळ एक आहे, ती म्हणजे पतीविरोधात पत्नीने अधिकृत तक्रार केली पाहिजे ज्यात पती आपला वाढदिवस विसरल्याचा स्पष्ट उल्लेख हावा. हा उल्लेखच पतीला तुरुंगामध्ये पाठवण्यास येथील कायद्यानुसार पुरेसा आहे.

पतीने पत्नीचा वाढदिवस विसरुन केलेली चूक कायम त्याच्या लक्षात रहावी आणि ती सुधारण्याची संधी त्याला मिळावी या हेतून ही तुरुंगवासाच्या शिक्षेचा कायद्यात समावेश असल्याचं सांगितलं जातं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: There is an actual country where forgetting wifes birthday is illegal can get husband jail time too scsg

ताज्या बातम्या