Video of girl dancing inside Delhi metro goes viral: दिल्लीची जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱ्या दिल्ली मेट्रोमध्ये दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे मेट्रोच्या शिस्तीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. एक काळ असा होता जेव्हा लोक मेट्रोमध्ये आरामात प्रवास करत असत, पण आता लोक मेट्रोमध्ये इतका गोंधळ घालू लागले आहेत की, सोशल मीडियावर दररोज मेट्रोचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही दिवसांत मेट्रोमध्ये झालेल्या मारामारीचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. याशिवाय मेट्रो रेल्वे हे रील बनवणाऱ्यांचेही केंद्र बनले आहे. दरम्यान, दिल्ली मेट्रोचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हिरव्या रंगाचा सूट घातलेली मुलगी मेट्रोच्या आत नाचत आहे. या मुलीला पाहून लोकांना सपना चौधरीची आठवण झाली. त्याचबरोबर लोक या मुलीच्या आत्मविश्वासाचे कौतुकही करत आहेत.

(हे ही वाचा : “आमच्या पप्पांनी बुटांनी हाणला…” तरुणाचा मजेशीर Video पाहून तुम्ही पोट धरुन हसाल! )

येथे पाहा व्हिडीओ

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मेट्रोच्या लेडीज कोचमध्ये हिरवा सूट घातलेली एक मुलगी गायिका बबिता चौधरीच्या ‘दिल धडके दर्द कलेजे में’ गाण्यावर डान्स करत आहे. डब्यात बसलेल्या सर्व महिला आरामात बसून मुलीचा डान्स पाहत आहेत. तिच्या नृत्यात कोणालाच अडचण नाही. काही महिला त्यांच्या फोनवर व्यस्त आहेत, तर काही नृत्याचा आनंद घेत आहेत.

kannu__coffee_girl नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ४८ हजार वेळा पाहिला गेला असून या व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले, “एवढा आत्मविश्वास असायला हवा. दुसऱ्या युजरने लिहिले, “याच कारणामुळे इतर राज्यांमध्ये मेट्रो सेवा सुरू होत नाहीये, असे कमेंट केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of a woman dancing inside moving delhi metro train is surfacing on the internet pdb
First published on: 29-09-2023 at 17:50 IST