सोशल मीडियावर एका पाठोपाठ एक व्हिडीओ समोर येत असतात ज्यामुळे अनेकदा आपल्याला चक्रावल्यासारखे होते. खूप विचित्र, अनेपिक्षत गोष्टी आणि माहिती आपल्या समोर येत असते अशामध्ये काही मोजके व्हिडीओ असे असतात जे सर्वांच्या चेहऱ्यावर हसू घेऊन येतात. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या अशाच सुंदर व्हिडीओची सध्या चर्चा होत आहे. व्हिडीओमधील व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हसू पाहून तुमचा आजचा दिवस नक्कीच सार्थ होईल. कारण त्याच्या हास्यमध्ये एक आनंद आहे आहे, न मिळालेल्या कौतुकाची पावती असल्याचे तुम्हाला जाणवेल.

इंस्टाग्रामवर आकाश सेल्वारासू या प्रतिभावान स्केच आर्टिस्टने त्याच्या खात्यावर एका व्हिडीओमध्ये एका सामान्य रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये प्रामाणिकपणे आपले काम करणाऱ्या या व्यक्तीचे सुंदर चित्र त्याने रेखाटले आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला हेअरनेट घालून रेस्टॉरंटमध्ये काम करणारा वेटर दिसत आहे. त्यानंतर आकाश मग त्या व्यक्तीचे हॉटलेच्या बिलवर सुंदर चित्र काढताना दिसतो. चित्र पूर्ण झाल्यावर, ते चित्र तो त्या व्यक्तीला भेट देतो. अनपेक्षितपणे मिळालेली ही भेट पाहून रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्याला आनंदाचा धक्का बसला आहे. चित्र पाहून त्याच्या चेहऱ्यावर जे हसू येते ते अमुल्य आहे. रेस्टॉरंटमधील वेटरच्या चेहऱ्यावरील हसू पाहून तुम्हालाही आंनद होईल. त्या व्यक्तीने कधी कल्पनाही केली नसेल की त्याचे कोणीतरी इतके सुंदर चित्र काढू शकतो. आपले चित्र पाहून तू खूप आनंदी झाला आहे हे स्पष्टपणे दिसते आहे. या सुंदर भेटवस्तूसाठी तो आकाशचे सतत आभार मानतो आणि व्हिडिओमध्ये तो फोटो त्याच्या सहकाऱ्यांना दाखवतो, जे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch waiters priceless reaction to sketch artists sweet surprise snk
First published on: 16-04-2024 at 17:46 IST