सध्या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून घर बसल्या खाद्यपदार्थ मागवण्याचे प्रमाण वाढले आहे. आज बाजारामध्ये झोमॅटो, स्वीगी, उबर इट्स, फूड पांडा यासारखे अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. खास ऑफर्स आणि घर बसल्या घरी पदार्थ आणून देण्याची सोय यामुळे या अॅप्सचा वापर दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. या अॅप्समुळे डिलेव्हरी बॉइजची मागणी वाढली आहे. त्यामुळेच अनेक तरुण डिलेव्हरी बॉय म्हणून अशा अॅप्लिकेशन्ससाठी नोकरी करताना दिसत आहे. हे डिलेव्हरी बॉइज अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. सध्या असाच एक डिलेव्हरी बॉय सोशल नेटवर्किंगवर चर्चेत आहे तो म्हणजे हरियाणातील कर्नाल येथील सुरज. सुरजने डिलेव्हरी बॉय म्हणून काम करत थोडे थोडे पैसे जमवून ड्रीम बाईक घेण्याचे आपले स्वप्न साकार केले आहे. झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल यांनीच ट्विट करुन सुरजच्या या प्रत्यक्षात अवतरलेल्या स्वप्नाबद्दल माहिती दिली आहे.

तुम्ही कष्ट केले, काम केले तर तुमचे स्वप्न पुर्ण करणे सहज शक्य आहे, तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही अशा आशयाचे ट्विट गोयल यांनी केले आहे. सुरजने घेतलेल्या केटीएम आरसी २०० या बाईकबद्दल बोलताना गोयल आपल्या ट्विटमध्ये लिहितात, ‘आमच्या कर्नाल टीममधील हा सुरज. मागील पाच महिन्यापासून तो त्याच्या स्वप्नातली बाईक घेण्यासाठी पैसे वाचवत होता. जर तुम्ही त्याला या सुपरकूल बाईकवर पाहिले तर नक्की हात दाखवा.’ पुढे त्यांनी झोमॅटोशी संबंधित अनेकांच्या प्रेरणादायी कथा असल्याचे म्हटले आहे. ‘झोमॅटो डिलेव्हरी युनिव्हर्समधील अनेक प्रेरणादायी कथांपैकी ही एक आहे. यशाच्या मार्गावर जाण्यासाठी ज्यांनी लक्ष्य केंद्रित केले आहे त्यांच्या कथा आहेत या,’ असं गोयल म्हणतात.

गोयल यांच्या या ट्विटवर अनेकांनी सुरजचे अभिनंदन केले आहे. तर काहींनी मात्र डिलेव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या सुरजने पाच महिन्यांच्या पगारामध्ये एवढी महाग बाईक कशी काय घेतली असा सवाल उपस्थित केला आहे. तर काहींनी झोमॅटोच्या डिलेव्हरी बॉइजला असा किती पगार आहे असा सवालही गोयल यांनी केला आहे. पाहुयात काही व्हायरल ट्विट…

दोन वर्ष कॉर्परेटमध्ये काम करुन मला कपडे परवडत नाहीत

जरा अती झालं

पाच नसेल पंचवीस महिने असेल

हिशोब

दोन वर्षात झोमॅटोच घेईल

पाच वर्षात ऑडी फोर

त्याला एवढा पगार आहे

पगार किती

आता केटीएमवर डिलेव्हरी देणार का?

दरम्यान, केटीएम आरसी २०० या बाईकची बाजारातील किंमत १ लाख ८० हजार १ लाख ते ९२ हजारच्या दरम्यान आहे. त्यामुळेच नेटकऱ्यांनी सुरजच्या पगाराची इतकी चौकशी केल्याचे चित्र दिसत आहे.