लॉर्ड मेयो (१८६९ – १८७२) : सर जॉन लॉरेन्सच्या निवृत्तीनंतर १८६९ मध्ये व्हाइसरॉय म्हणून मेयोची नियुक्ती झाली.डिसेंबर १८७० मध्ये रिचर्ड स्ट्रॅचीने वित्त विकेंद्रीकरणाची घोषणा केली.स्ट्रॅचीने तूट भरून काढण्यासाठी विकासकामांमध्ये कपात, आणि आयकरात वाढ केली. मीठ करात सुधारणा केल्या.स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मेयोने १८७० मध्ये स्थानिक स्वतंत्र शासन समित्या स्थापन केल्या.
संस्थानिकांच्या आणि सरदारांच्या शिक्षणासाठीचे पहिले महाविद्यालय अजमेर येथे सुरू केले.१८७२ मध्ये मेयोच्या काळात भारतात जनगणना झाली.मेयो याला आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण करणारा व्हाइसरॉय म्हणतात.
जानेवारी १८७२ मध्ये अंदमान येथे कैद्यांची पाहणी करत असताना एका पठाणाकडून मेयोची हत्या झाली.
व्हाइसरॉय लॉर्ड नॉर्थब्रुक (१८७२ – १८७६) : १८५३ मध्ये लॉर्ड नॉर्थब्रुक हा चार्ल्स वुडचा सचिव होता. १८७२ मध्ये नॉर्थब्रुक व्हाइसरॉय झाला. लॉर्ड नॉर्थब्रुक हा अनियोजित खासगी आíथक व्यवहार (laisser faire) आणि मुक्त व्यापार धोरण (Free Trade Policy) यांचा पुरस्कर्ता होता.
त्याच्या कार्यकाळात पंजाबातील कुका चळवळीचा सामना त्याला करावा लागला. त्याच्या कारकीर्दीत १८७५ साली मुंबईत आर्य समाजाची व थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना झाली.
नॉर्थब्रुकची कारकीर्द अफगाणविरोधी धोरणाकरता प्रसिद्ध आहे. इंग्लंड सत्ताधीशांमधील मतभेदांमुळे मुदतीच्या आधी वर्षभरापूर्वीच त्याने राजीनामा दिला.
लॉर्ड लिटन (१८७६ – १८८०) : लॉर्ड लिटन हा कट्टर साम्राज्यवादी होता, म्हणून त्याची भारताच्या व्हाइसरॉयपदी १८७६ मध्ये नेमणूक केली. त्याच्या कार्यकाळात १८७६-७७ मध्ये मद्रास, मुंबई, पंजाब या भागांत दुष्काळ पडला. या कालावधीत दुष्काळामुळे ५० लाख व्यक्ती मृत्यू पावल्या आणि २० लाख हेक्टर जमीन नापीक झाली. व्हाइसरॉयने दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी हेतूने स्ट्रॅची दुष्काळ निवारण समिती नेमली (अहवाल १८८०). या समितीचा अहवाल स्वीकारून सरकारने १८८३ साली दुष्काळ संहिता जाहीर केली.
लिटनच्या उद्दाम धोरणामुळे दुसरे अफगाण युद्ध उद्भवले.
१८७७ साली पहिला दिल्ली दरबार भरवून राणी व्हिक्टोरियाने ‘भारतसम्राज्ञी’ हा किताब धारण केल्याचे जाहीर केले. त्यावर देशी वृत्तपत्रांनी टीकेची झोड उठवल्याने मार्च १८७८ मध्ये देशी वृत्तपत्रांवर र्निबध टाकणारा ‘देशी वृत्तपत्र कायदा’ (Vernacular Press Act,, १८७८) संमत करून वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी केली.
‘अमृत बझार पत्रिका’ हे देशी वृत्तपत्र तेव्हापासून इंग्रजी भाषेत सुरू आहे.
१८७८ मध्ये शस्त्रबंदी कायदा केला.
लिटनच्या काळात भारतीय मुलकी सेवा कायदा १८७९ (Statutory Civil Services Ac, १८७९) संमत झाला.
आयसीएस परीक्षेचे वय २१ वरून १९ वर्षांवर आणले.
व्हाइसरॉय लॉर्ड रिपन (१८८० – १८८४) : भारतीयांसाठी हा उदारमतवादी व्हाइसरॉय म्हणून ओळखला जातो.
इ.स. १८३२ च्या इंग्लंडमधील फॅक्टरी अ‍ॅक्टनुसार, रिपनने १८८१ मध्ये फॅक्टरी अ‍ॅक्ट संमत केला. १९ जानेवारी १८८२ रोजी रिपनने Vernacular Press Act रद्द केला.
* रिपनने शिक्षणपद्धतीच्या पाहणीकरता १८८२ मध्ये हंटर समिती नेमली. हंटर समितीच्या शिफारसी स्वीकारून लाहोर येथे पंजाब व अलाहाबाद विद्यापीठाची स्थापना केली.
१८८२ मध्ये त्याने स्थानिक स्वराज्य संस्था कायदा संमत केला. रिपनने स्थानिक भारतीयांना त्यावर नियुक्त केले. त्यामुळे रिपनला ‘स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक’ असे संबोधले जाते.

Japan moving closer to a future female empress_
जपानला महिला सम्राज्ञी मिळणार का? कायदा काय सांगतो?
Bihar Lok Sabha Election Nitish Kumar Tejashwi Yadav Narendra Modi
तेजस्वींचा उदय, तर नितीश कुमारांचा अस्त; बिहारच्या राजकारणात ‘मोदी फॅक्टर’ चालेल का?
Mumbai, Redevelopment dispute,
मुंबई : सिंधी निर्वासितांच्या पुनर्विकासाचा वाद न्यायालयात
BJP using social media influencers for election campaign Lok Sabha elections 2024
निवडणूक प्रचारात इन्फ्लूएन्सर्सची एंट्री; भाजपाची काय आहे क्लृप्ती?