विरार : मुंबई अहमदाबाद महामार्गावर असलेल्या सेवा रस्त्यांवर अनेक अवजड वाहने बेकायदा उभी केलेली दिसतात. त्यामुळे नागरिकांना आणि प्रवाशांना अनेक अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी सेवा मार्गावर गॅरेज आणि भंगारचे कारखाने, हॉटेलवाल्यांचे अनधिकृत वाहनतळ निर्माण होत असल्याने सेवा मार्गावर अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे हे सेवा मार्ग मोकळे करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

वसई विरार परिसरात विरार पूर्व ते घोडबंदर या परिसरात मोठय़ा प्रमाणात उपाहारगृहे, कारखाने आणि इतर कंपन्यांची गोदाम असल्याने, तसेच शहरात दाखल होण्यासाठी प्रवासी सेवा मार्गाचा वापर करत असतात. पण महामार्ग प्राधिकरणाने तयार केलेल्या या सेवा मार्गावर अवजड वाहनेच उभी केली जातात. गुजरात, दिल्ली, राजस्थान अथवा मुंबईकडे जाणारी अवजड वाहने विश्रांतीसाठी या सेवा मार्गाचा वापर करत आहेत. तर काही ठिकाणी खासगी बस सेवाधारकांनी या सेवा मार्गावर आपले थांबे बनविले आहेत. त्यात रस्त्यालगत असलेल्या हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची वाहने उभी करण्यासाठीही या सेवा मार्गाचा वापर होतो आहे.

Two railway gates closed between Satara-Sangli Road traffic will be closed for some time
सातारा-सांगलीदरम्यान दोन रेल्वे फाटक बंद; रस्ते वाहतूक काही काळ बंद राहणार
remaining three lanes of the Shilphata flyover are open for traffic in thane
ठाणे : शिळफाटा उड्डाणपूलाच्या उर्वरित तीन मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या
Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Block. Konkan Railway, trains,
कोकण रेल्वेवर ब्लॉक; रेल्वेगाड्यांचा खोळंबा

वाहनदुरुस्तीची दुकाने या सेवा रस्त्यांवर आणून दुरुस्त करताना दिसतात. तसेच माल वाहतूक टेम्पोसुद्धा याचा रस्त्यावर सर्रास उभे करून व्यवसाय केला जातो. अपघातग्रस्त वाहने, भंगार, बेवारस वाहने उभी करण्याचे सेवा रस्ता हे जणू हक्काचे ठिकाण झाले आहे. हे सेवा रस्ते गिळंकृत करण्याचे अवैध प्रयत्न सुरू असताना पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत. पेल्हार परिसरात असलेल्या सेवा रस्त्यावर या वाहनांच्या आड काही तृतीयपंथीय देहव्यापार करत असल्याचेही स्थानिकांनी सांगितले. सेवा मार्गावर अतिक्रमण झाल्याने इतर प्रवासी वाहनांना  शहरात दाखल होताना अथवा महामार्गावरील वळण घेताना जागा शिल्लक न राहिल्याने अनेकदा अपघात होतात. रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांचा अंदाज न आल्याने वाहने धडकून अपघात होतात. त्यामुळे हे सेवा मार्ग लवकरात लवकर मोकळे करावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.